Assembly Election Results : नसलेल्या ताकदीच्या बळावर 'किंगमेकर' होऊ पाहणाऱ्यांना मतदारांनी बाजूला सारले

Maharashtra Election Update Mahayuti Mahavikas Aghadi : राजकारण कुणीही करू शकतो, निवडणूक कुणीही लढवू शकतो. लोकशाहीने दिलेला तो अधिकार आहे. मात्र नसलेल्या ताकदीच्या बळावर किंगमेकर ठरण्याच्या, कोणाला तरी धडा शिकवण्याची भाषा करणाऱ्यांना या निवडणुकीत मतदारांनी बाजूला सारले आहे.
Maharashtra Assembly Election
Maharashtra Assembly ElectionSarkarnama
Published on
Updated on

आमच्याशिवाय सरकार बनणार नाही, आम्हीच सरकार स्थापन करणार, माझ्याकडे अमुक समाजाला आरक्षण देण्याचा फॉर्म्युला आहे, पण मी सांगणार नाही, सत्तेत सहभागी होणार, आता अमुक पक्षाचा मुख्यमंत्री होणार, पुढच्या निवडणुकीत आमचाच मुख्यमंत्री होणार, अमुक पक्षाचे इतके आमदार तर पडलेच समजा, आता ताकद दाखवून द्या, सुपडा साफ झाला पाहिजे... ही गेल्या काही महिन्यांपासून सतत कानावर धडकणारी विधाने आहेत. अशी विधाने करणाऱ्या नेत्यांचा मतदारांनी विधानसभेच्या या निवडणुकीत एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाकला आहे.

उमेदवार निवडून आणण्याइतपत शक्ती नसलेल्या, पण प्रमुख उमेदवारांची समीकरणे बिघडवू शकणाऱ्या पक्षांची नेहमीच चलती असते. महाराष्ट्रात गेल्या काही निवडणुकांपासून अशा तथाकथित किंगमेकर नेत्यांची संख्या वाढली आहे. विधानसभेच्या या निवडणुकीत मतदारांनी अशा किंगमेकरना शांतपणे बाजूला सारून भानावर येण्याचा सल्ला दिला आहे. महायुतीला मोठे बहुमत मिळाल्यामुळे या नेत्यांची बार्गेनिंग पॉवर शून्य झाली आहे. धार्मिक तेढ निर्माण करू पाहणाऱ्या, मोठा गाजावाजा करून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अशा एका पक्षाला मतदारांनी साफ नाकारले आहे.

Maharashtra Assembly Election
Manoj Jarange Patil : विजयी होताच 'या' आमदाराने मानले जरांगे पाटलांचे आभार, म्हणाले, "माझ्या विजयामध्ये..."

एखादा समाज, मतदारांच्या वर्गाच्या जिवावर अशा नेत्यांचे पीक फोफावले आहे. स्वतःचे उमेदवार उभे करण्याचा, त्यांना निवडून आणण्यासाठी निवडणूक लढवण्याचा हक्क प्रत्येक पक्षाला लोकशाहीने दिलेला आहे. मात्र असे किंगमेकर हे वेषांतर करून मैदानाच उतरत होते, उतरले होते; म्हणजे विकासकामांसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणाऱ्या या नेत्यांचा हेतू लक्षात येत नसे. एकदा सत्ता द्या, मग अमुक करतो, तमुक करतो, सत्तेत सहभागी होणार आदी गर्जना या नेत्यांकडून केल्या गेल्या.

आपल्या पक्षाचा एकही उमेदवार विजयी होण्याची शाश्वती नसताना नेत्यांकडून मोठी आश्वासने कशाच्या आधारावर दिली गेली होती, हा खरा प्रश्न आहे. आता अमुक पक्षाचा मुख्यमंत्री होणार, पुढील निवडणुकीत आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार, अशी गर्जना करणारा पक्ष एकही जागा जिंकू शकत नाही, याला काय म्हणावे? अमुक समाजाला आरक्षण देण्यासाठीचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे, मात्र मी तो सांगणार नाही..., सुपडा साफ करून टाका, अशी अनेक विधाने गेल्या काही महिन्यांपासून लोकांच्या कानावर धडकत होती.

Maharashtra Assembly Election
Bapusahab Pathare : नवीन आमदार करण्याचा ट्रेंड 'या' मतदारसंघात कायम; पुण्यात तुतारी वाजली!

अशी विधाने, गर्जना करून आपण किंगमेकर ठरणार, अशा थाटात वावरणाऱ्या काही पक्षांचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. आमच्याशिवाय सरकार बनणार नाही, आमची भूमिका महत्वाची राहील, आम्ही सरकार स्थापन करू, अशी दर्पोक्ती करणाऱ्या पक्षाच्या प्रमुखालाच मतदारांनी पराभवाची धूळ चारली आहे. आपल्या शक्तीचा अंदाज असतानाही अशी विधाने करणाऱ्या नेत्यांना मतदारांनी नाकारले आहे. नुसते नाकारलेच नाही तर त्यांना मान वर करण्याची संधीही ठेवलेली नाही.

विकासकामे, विधायक कामांपेक्षा बहुतांश राजकीय पक्ष, नेत्यांचा कल ध्रुवीकरणाकडे झुकू लागला आहे. त्यामुळे समाजात संभ्रम पसरत आहे. एकमेकांप्रती अविश्वासाची भावना निर्माण होत आहे. राजकीय पक्ष, नेत्यांची निवडणूक होते, सत्तेचे राजकरण होते, मात्र समाजातील वातावरण कलुषित होत आहे. अशा परिस्थितीत तथाकथित किंगमेकरचीही भर पडली आहे. नसलेल्या बळावर कोणाला तरी धडा शिकवण्याची भाषा करणाऱ्यांना मतदारांनी शांतपणे बाजूला सारले आहे. यापासून हे किंगमेकर धडा घेणार का, हा खरा प्रश्न आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com