Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar : निकालानंतर शरद पवारांचा पहिला दौरा ठरला, 'या' शहरात ठेवणार पहिले पाऊल; काय बोलणार?

Maharashtra Assembly Election Result Sharad Pawar : महाविकास आघाडीसाठी विधानसभा निवडणुकीचा निकाल धक्कादायक आहे. लोकसभेला मोठे यश मिळवणारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे फक्त 10 उमेदवार विजयी झाल्याचे चित्र आहे.

सरकारनामा ब्यूरो

हेमंत पवार

Sharad Pawar News : महाविकास आघाडीसाठी विधानसभा निवडणुकीचा निकाल धक्कादायक आहे. लोकसभेला मोठे यश मिळवणारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे फक्त 10 उमेदवार विजयी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे शरद पवार हे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवारांची अजून कुठलीही प्रतिक्रिया समोर आली नाही. मात्र, उद्या (रविवारी) ते कऱ्हाड दौऱ्यावर असणार आहेत.

विधानसभा निकालानंतर पहिल्यांदाच जेष्ठ नेते पवार कऱ्हाड दौऱ्यावर येत आहेत. रविवारी सायंकाळी ते हेलिकॉप्टरने येथील विमानतळावर येतील. तेथून ते एका हॉटेलवर मुक्कामी थांबणार आहेत. तेथे जिल्ह्यातील विधानसभा निकालाचा आढावा घेण्याची शक्यता आहे.

सोमवारी (ता. 25) सकाळी आठ वाजता जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त ते त्यांच्या कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी रवाना होतील. समाधीस अभिवादन करुन ते तेथील संगीत कार्यक्रमास भेट देवुन वेणुताई चव्हाण सभागृहाकडे रवाना होतील. तेथे यशवंतराव चव्हाण ट्रस्टच्या बैठकीस ते उपस्थित राहतील. तेथुन ते येथील विमानतळावरुन हेलीकॉप्टरने मुंबईकडे रवाना होणार आहेत.

सातारा जिल्ह्यात मविआला फटका

महाविकास आघाडीला सातारा जिल्ह्यात मोठा फटका बसला आहे. या जिल्ह्यातील सर्व जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पराभूत व्हावे लागले. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या दौऱ्यात शरद पवार काय बोलणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT