Solapur Assembly Result : अख्ख्या राज्यात 10 जागा जिंकणाऱ्या पवारांच्या राष्ट्रवादीला सोलापूरने दिले चार आमदार

Assembly Election 2024 Result : सोलापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकल्यानंतर महाविकास आघाडीची गाडी जोरात होती. त्यातूनच आघाडीच्या नेत्यांनी जागा वाटपापासून चुका केल्या. जिंकण्याच्या स्थितीत असणारे मतदारसंघात वादग्रस्त आणि कठीण बनवले.
Solapur Assembly Election Result-2024
Solapur Assembly Election Result-2024Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 23 November : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील सामाना बरोबरीत सुटला आहे. जिल्ह्यातील अकरांपैकी तब्बल पाच जागा एकट्या भाजपने जिंकल्या आहेत, महाविकास आघाडीनेही पाच जागांवर विजय मिळविला आहे. शेतकरी कामगार पक्षाने सांगोला हा बालेकिल्ला पुन्हा एकदा ताब्यात घेतला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून दहा जागा जिंकणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तब्बल चार उमेदवार एकट्या सोलापुरातून निवडून आले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

सोलापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकल्यानंतर महाविकास आघाडीची गाडी जोरात होती. त्यातूनच आघाडीच्या नेत्यांनी जागा वाटपापासून चुका केल्या. जिंकण्याच्या स्थितीत असणारे मतदारसंघात वादग्रस्त आणि कठीण बनवले. त्यातूनच काही जागा महाविकास आघाडीने हातच्या घालवल्या. यामध्ये तीनही पक्षांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा...

सोलापूर दक्षिण मतदारसंघातून माजी आमदार दिलीप माने यांची उमेदवारी भाजपसाठी डोईजड ठरली असती. त्या ठिकाणी शिवसेनेने उमेदवार जाहीर करण्याची घाई केली. काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांच्या संवादातून त्यातून मार्ग काढता आला असता मात्र दोन्हीकडूनही परिपक्वता दाखवली गेली नाही.

Solapur Assembly Election Result-2024
Narayan Patil Won : ‘तो’ निर्णय ठरला टर्निंग पॉईंट अन्‌ नारायण पाटलांनी 2019 च्या पराभवाचं उट्टं काढलं

तोच प्रकार पंढरपूरमध्ये घडला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार देऊनही भगीरथ भालके यांनी आमदार समाधान आवताडे यांना जोरदार टक्कर दिली. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल सावंत यांनी घेतलेली दहा हजार मते भालकेंच्या पराभवाला कारणीभूत ठरली आहेत. या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत विसंवाद दिसून आला.

दरम्यान, विसंवादानंतरही महाविकास आघाडीने सोलापूरमध्ये महायुतीला जोरदार टक्कर दिली आहे. महाविकास आघाडीने पाच जागा जिंकल्या असून सांगोल्याची जागा मित्रपक्ष शेतकरी कामगार पक्षाने जिंकली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने तब्बल चार जागांचे योगदान दिले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय विजयी उमेदवार, मताधिक्य, पक्ष मिळालेली मते

करमाळा : नारायण पाटील ( 16085 विजयी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 96 हजार 091), संजय शिंदे (80 हजार 006 मते पराभूत अपक्ष)

मोहोळ : राजू खरे (30202 मतांनी विजयी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 1 लाख 25 हजार 838), यशवंत माने (95 हजार 636 मते राष्ट्रवादी काँग्रेस, पराभूत)

माळशिरस : उत्तम जानकर (13147 मतांनी विजयी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 1 लाख 21 हजार 713), राम सातपुते (1 लाख 08 हजार 566 भाजप, पराभूत)

माढा : अभिजीत पाटील (30621 विजयी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 1 लाख 36 हजार 559 मते), रणजितसिंह शिंदे (1 लाख 05 हजार 938 अपक्ष पराभूत)

बार्शी : दिलीप सोपल (6 हजार 472 विजयी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 1लाख 22 हजार 694 ), राजेंद्र राऊत (1 लाख 16 हजार 222 शिवसेना, पराभूत)

Solapur Assembly Election Result-2024
Solapur Politic's : काकांच्या स्वप्नाचा चक्काचूर; पुतण्या पहिल्याच निवडणुकीत पोचला विधानसभेत!

सांगोला : डॉ. बाबासाहेब देशमुख (25 हजार 386 मतांनी विजयी, शेकाप 1 लाख 16 हजार 256), शहाजीबापू पाटील (90 हजार 870 मते शिवसेना पराभूत)

सोलापूर शहर मध्य : देवेंद्र कोठे (48850 मतांनी विजयी, भाजप 1 लाख 10 हजार 278 मते), फारूक शाब्दी (61 हजार 428 मते एमआयएम पराभूत)

अक्कलकोट : सचिन कल्याणशेट्टी (49572 मतांनी विजयी, भाजप 1 लाख 48 हजार 105 मते), सिद्धाराम म्हेत्रे (98 हजार 533 मते काँग्रेस, पराभूत)

सोलापूर दक्षिण : सुभाष देशमुख (77 हजार 127 मतांनी विजयी, भाजप 1लाख 16 हजार 932 मते ), अमर पाटील (39805 मते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, पराभूत)

सोलापूर शहर उत्तर : विजयकुमार देशमुख (54583 मतांनी विजयी, भाजप 1लाख 17 हजार 215), महेश कोठे (62 हजार 632 मते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, पराभूत)

पंढरपूर : समाधान आवताडे (8430 मतांनी विजयी, भाजप 1 लाख 25 हजार 163), भगीरथ भालके (1 लाख 16 हजार 733 मते काँग्रेस पराभूत)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com