Latur Assembly 2024 Result: लातूरमध्ये अमित देशमुखांच्या सरंजामी थाटाची 'गढी' उद्ध्वस्त होता होता वाचली

Assembly 2024 Result : केंद्रात विविध मंत्रिपदे भूषवलेल्या शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा अर्चना पाटील चाकूरकर यांना भाजपने उमेदवारी दिली आणि त्यांनी काँग्रेसचे अमित देशमुख यांना अक्षरशः झुंजवले. 1995 च्या निवडणूक निकालाची पुनरावृत्ती थोडक्यात वाचली.
Amit deshmukh, Archana Patil
Amit deshmukh, Archana Patil Sarkarnama
Published on
Updated on

latur News : अमित देशमुख पराभूत होणार, अशी वातावरणनिर्मिती झाली होती, ती त्यांच्या सरंजामी थाटामुळे. वडील, दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची पुण्याई आणि काका दिलीपराव देशमुख यांचे नियोजन कामाला आले आणि त्यांचा निसटता का होईना ? विजय झाला. भाजपच्या अर्चना पाटील चाकूरकर यांनी अमित देशमुखांना अक्षरशः घाम फोडला. (Latur Assembly 2024 Result News)

लातूर शहर विधानसभा मतदारसंघाच्या निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अख्खी हयात काँग्रेसमध्ये घालवलेल्या, केंद्रात विविध मंत्रिपदे भूषवलेल्या शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा अर्चना पाटील चाकूरकर यांना भाजपने उमेदवारी दिली आणि त्यांनी काँग्रेसचे अमित देशमुख यांना अक्षरशः झुंजवले. 1995 च्या निवडणूक निकालाची पुनरावृत्ती थोडक्यात वाचली. अमित देशमुख यांचे वडील, दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची पुण्याई कामाला आली आणि ते 7073 मतांनी विजयी झाले.

Amit deshmukh, Archana Patil
Hingoli Assembly 2024 Result : हिंगोलीतील चुरशीच्या लढतीत भाजपच्या मुटकुळेंची हॅट्ट्रिक

अमित देशमुख यांच्याबाबत मतदारसंघात नाराजी आहे, याला त्यांचा सरंजामी थाट कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. ते लोकांत मिसळत नाहीत, लोकांशी फटकून वागतात, अशा तक्रारी आहेत. अमित देशमुख हे सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांच्या कारकीर्दीत लातूर शहरात म्हणावी तशी विकासकामे झालेली नाहीत. विलासरावांच्या निधनांनंतर पाठीशी शहराचा विकास खुंटला, हेही त्यांच्याविरोधातील नाराजीचे एक कारण आहे. अशा परिस्थितीत भाजपने त्यांच्याविरोधात अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे मतदारांना सक्षम पर्याय उपलब्ध झाला होता.

Amit deshmukh, Archana Patil
Umarga-Lohara Assembly Election : ज्ञानराज चौगुले आमचे ओपनिंग बॅट्समन : श्रीकांत शिंदे

लोकसभा निवडणुकीत अमित देशमुख यांनी विरोधकांना गार केले होते. लातूर, शेजारच्या धाराशिवसह जालना लोकसभा मतदारसंघातही त्यांनी लक्ष घातले होते. या तिन्ही ठिकाणी काँग्रेसचे (Congress)उमेदवार विजयी झाले. लातूर मतदारसंघातून देशमुख यांनी डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी देऊन विरोधकांची कोंडी केली होती. डॉ. काळगे हे जंगम समाजाचे आहेत. लिंगायत समाज काँग्रेसपासून दुरावला होता. डॉ. काळगे यांना उमेदवारी दिल्यामुळे हा समाज बऱ्याच प्रमाणात काँग्रेसकडे (Amit Deshmukh) वळला होता. त्यामुळे डॉ. काळगे विजयी झाले होते. हे अमित देशमुख यांचे यश होते. मात्र अर्चना पाटील चाकूरकर यांच्या उमेदवारीमुळे विधानसभा निवडणुकीत ही समीकरणे बदलून गेली होती.

Amit deshmukh, Archana Patil
Dharashiv Assembly Election: ठाकरेंवरील निष्ठेमुळे नव्हे तर 'या' धमकीमुळे कैलास पाटील सुरतमधून माघारी फिरले, जुन्या सहकाऱ्याचा मोठा दावा

लोकसभा निवडणुकीतील यशामुळे अमित देशमुख हे राज्यस्तरीय नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. पक्षसंघटनेत त्यांचे वजन वाढले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तिकीटवाटपात त्यांच्या शब्दाला किंमत मिळाली. जिल्ह्याबाहेरच्याही काही मतदारसंघांतील उमेदवार अमित देशमुख यांनीच निश्चित केले. पक्षसंघटनेत देशमुखांचे वजन वाढल्यामुळे त्यांना मतदारसंघात अडकवून ठेवण्याची भाजपची रणनिती होती. त्यानुसारच अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती, असे असले तरी अमित देशमुख अडकून पडले नाहीत. त्यांनी शेजारच्या जिल्ह्यांतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठीही प्रचारसभा घेतल्या, मात्र स्वतःच्या मतदारसंघात पिछाडीवर गेले होते.

Amit deshmukh, Archana Patil
Maharshtra Assembly Election: धाकधूक वाढली; अंतिम आकडेवारीनुसार राज्यातील 'या' दहा मतदारसंघात सर्वाधिक मतदान

काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले होते. मात्र हा निर्णय आपल्या सूनबाईंचा आहे, असे त्यांनी सांगून टाकले होते. ते एकदा भाजपच्या प्रचार कार्यालयात गेल्याचे छायाचित्र मध्यंतरी व्हायरल झाले होते. हे वगळता ते प्रचारात दिसले नाहीत किंवा त्यांनी आपल्या सूनबाईंसाठी प्रचारही केला नाही. असे असले तरी त्यांच्या मान्यतेनेच त्यांनी भाजपची उमेदवारी घेतली, असा संदेश समाजात गेला. त्यामुळे अमित देशमुख यांची कोंडी झाली. ते पडणार, अशा चर्चा रंगू लागल्या होत्या.

Amit deshmukh, Archana Patil
Maharshtra Political News : विधानसभेत ऐतिहासिक दोन तृतीयांश बहुमत मिळवणारे पहिले मुख्यमंत्री कोण माहिती ?

अमित देशमुख पिछाडीवर असल्याचा अंदाज त्यांचे काका माजीमंत्री दिलीपराव देशमुख यांना आला होता. त्यामुळे शेवटच्या तीन दिवसांत त्यांनी यंत्रणा आपल्या हाती घेतली. अन्य लोकांना लातूर ग्रामीणमध्ये लक्ष घालण्यास सांगितले. लातूर ग्रामीणमधून अमित देशमुखांचे बंधू आमदार धीरज देशमुख हे काँग्रेसचे उमेदवार होते. भाजपच्या रमेश कराड यांनी त्यांचा पराभव केला. दिलीपराव देशमुखांनी यंत्रणा हातात घेतल्यामुळे अमित देशमुखांची गढी उद्धस्त होता होता वाचली. ही निवडणूक जिंकण्यासाठी अमित देशमुखांना घाम फुटला होता.

Amit deshmukh, Archana Patil
Shivsena News : मोठी बातमी, एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराचा पाठलाग, वाहनावर गोळीबार; नेमकं काय घडलं, तिघांविरोधात गुन्हा दाखल

विलासराव देशमुख यांना मानणारा वर्ग अद्यापही मोठ्या संख्येने आहे. विलासरावांची ही पुण्याईही अमित देशमुख यांच्या कामी आली. त्याला काका दिलीपरावांच्या नियोजनाची जोड मिळाली. 1995 च्या निवडणुकीत विलासराव देशमुख यांचा पराभव झाला होता. त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली होती. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विनोद खटके यांना 26 हजार मते मिळाली. त्यांना आणखी काही हजार मते मिळाली असती तर देशमुखांची गढी उद्ध्वस्त झाली असती. सलग चौथ्यांदा विधानसभेत पोहोचलेले अमित देशमुख आतातरी सरंजामी थाट बाजूला सारून लोकांमध्ये मिसळणार का, हा खरा प्रश्न आहे.

Amit deshmukh, Archana Patil
Ajit Pawar : निकालानंतर अजित पवारांची मोठी कबुली; म्हणाले, 'लाडकी बहीण योजनाच ठरली गेमचेंजर'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com