CEC Rajiv Kumar Sarkarnama
महाराष्ट्र

Election Commission : पुणे, मुंबई अन् ठाणेकरांचं हे वागणं बरं नव्हं! निवडणूक आयुक्त नाराज

Assembly Election Voting Pune Mumbai Thane Rajiv Kumar : लोकसभा निवडणुकीत प्रामुख्याने शहरी भागांत कमी मतदान झाले होते.

Rajanand More

New Delhi : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयुक्तांना वेगळीच चिंता लागली आहे. प्रामुख्याने पुणे, मुंबई आणि ठाणेकरांवर त्यांची नाराजी असल्याचे समोर आले. याचे कारणही तसेच आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करूनही शहरी भागात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. मतदानाबाबत उदासिनतेचा हा ट्रेंड योग्य नसल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात मागील विधानसभा निवडणुकीत मुंबईतील कुलाबा, पुण्यातील पुणे कॅन्टोन्मेंट आणि ठाण्यातील डोंबिवली विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी चिंताजनक होती.

राज्याच्या सरासरीच्या जवळपासही हा आकडा नव्हता. राजीव कुमार यांनी ही चिंतेची बाब असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी नुकत्याच जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या निवडणुकीतील मतदानाचे उदाहरण दिले. काश्मीरमध्ये 70 टक्के मतदान होऊ शकते, मग महाराष्ट्रात का नाही, असेही ते म्हणाले.

काही महिन्यांपूर्वीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही शहरी भागातून कमी प्रतिसाद मिळाला. देशात सर्वात कमी मतदान झालेल्या टॉप टेन मतदारसंघांपैकी सहा मतदारसंघ एकट्या महाराष्ट्रातील होते. त्यामध्ये कल्याण, पुणे, ठाणे, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य या मतदारसंघांचा समावेश आहे.

...म्हणून बुधवारी मतदान

शहरी भागातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सुट्टीच्या दिवशी मतदान न ठेवता बुधवारी ठेवण्यात आल्याचे राजीव कुमार यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे महापालिका आयुक्त तसेच इतर अधिकाऱ्यांनाही शहरी भागातील मतदान वाढवण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या जाणार असल्याचे निवडणूक आयुक्तांनी सांगितले.   

महाराष्ट्रात 23 नोव्हेंबरला मतमोजणी

महाराष्ट्रामध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली असून एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतदान 20 नोव्हेंबरला होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला संपणार असल्याने त्याआधीच तीन दिवस निवडणुकीची प्रकिया पूर्ण केली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT