Bypolls Election Dates : नांदेडची पोटनिवडणूक जाहीर; वायनाड लोकसभेसह 48 विधानसभा मतदारसंघांमध्येही रणसंग्राम; असे आहे वेळापत्रक...

Bypoll Lok Sabha Election Nanded to Wayanad : नांदेड आणि वायनाड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक काँग्रेससाठी प्रतिष्ठेची असेल.
Election Commission
Election CommissionSarkarnama
Published on: 
Updated on: 

New Delhi : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आली. त्यासोबतच नांदेड आणि वायनाड लोकसभेसह देशभरातील 48 विधानसभा मतदारसंघांची पोटनिवडणूकीच्या तारखाही घोषित करण्यात आल्या आहेत.

काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे. तर वायनाडसह रायबरेली या दोन मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या मतदारसंघातही पोटनिवडणूक घेतली जाणार आहे.

वायनाडमध्ये 13 नोव्हेंबरला मतदान होणार असून नांदेडमध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या मतदानादिवशी म्हणजे 20 नोव्हेंबरला मतदान होईल. तर विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसोबत या पोटनिवडणुकीचीही मतमोजणी होईल.

Election Commission
Maharashtra Election 2024 : मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीचा शंखनाद, 20 नोव्हेंबरला मतदान; 'या' दिवशी लागणार 'युती की आघाडी'चा निकाल

या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक

देशातील 14 राज्यांतील 48 विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. त्यामध्ये सर्वाधिक 9 मतदारसंघ उत्तर प्रदेशातील आहेत. त्यापाठोपाठ राजस्थानमध्ये 7, पश्चिम बंगाल 6, आसाम 5, बिहार व पंजाब प्रत्येकी 4, कर्नाटक 3, केरळ, सिक्कीम आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी 2 आणि छत्तीसगड, गुजरात, मेघालय व उत्तराखंडमध्ये प्रत्येक एका मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

पोटनिवडणुकीचे वेळापत्रक

वायनाड लोकसभा मतदारसंघ व 47 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 18 ऑक्टोबरला नोटिफिकेशन जारी केले जाईल. अर्ज करण्यासाठी २५ ऑक्टोबर ही अंतिम तारीख असेल. 28 ऑक्टोबरला अर्जांची छाननी तर 30 ऑक्टोबरला अर्ज घेण्याचा अखेरचा दिवस असेल. त्यानंतर 13 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

Election Commission
Jharkhand Assembly Election : झारखंड विधानसभेच्या तारखा जाहीर; दोन टप्प्यांत होणार निवडणूक

उत्तराखंडमधील एक विधानसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 22 ऑक्टोबरला नोटिफिकेशन जारी केले जाणार आहे. 29 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून 30 ऑक्टोबरला छाननी होईल. तर 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. या दोन मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून सर्व मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.