Ladki Bahin Yojana Sarkarnama
महाराष्ट्र

Result of Maharashtra Election 2024: लाडक्या बहिणींची जादू चालली, महायुती 200 पार...

Magic of women voters in Maharashtra elections 2024: महिलांचे यंदा तब्बल 65 टक्के मतदान झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल सहा टक्के अधिक होते.

Roshan More

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Result : विधानसभा निवडणुकीत सुरवातीच्य कलांमध्ये महायुती तब्बल 210 जागांवर आघाडीवर आहे. त्यामध्ये भाजप तब्बल 125 जागांवर आघाडी आहे. त्यामुळे महिलांच्या वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारी महायुतीच्या पारड्यात गेल्याचे चित्र आहे. महिलांचे यंदा तब्बल 65 टक्के मतदान झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल सहा टक्के अधिक होते.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत 2 कोटी 48 लाख 52 हजार महिलांनी मतदान झाले. मात्र यंदाच्या निवडणुकीत तब्बल 3 कोटी 6 लाख 49 हजार महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे 2019 च्या तुलनेत तब्बल 57 लाख 96 हजार अधिक महिलांनी मतदान केले होते.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

भाजपचा रेकाॅर्डब्रेक विजयाकडे

महायुती तब्बल 215 जागांवर आघाडीवर असताना भाजप 125 जागांवर सुरवातीला आघाडीवर दिसत आहे. तर एकनाथ शिंदेंची शिवसेना 55 तर,अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा...

हा जनतेचा कौल नाही

सुरवातीच्या कलामध्ये महायुती मोठ्या आघाडीकडे वाटचाल करत असताना संजय राऊत यांनी हा हा जनतेचा कौल नाही, हा अदानी आणि पैशांचा कौल , यात काही तरी गडबड आहे, असा आरोप केला. लाडक्या बहि‍णींचा फायदा महायुतीला झाला तर मग लाडके आजोबा, लाडके भाऊ यांचे काय झाले असा सवाल देखील राऊत यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT