Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघ राज्यभरात चर्चेचा विषय ठरला होता.अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे अशी थेट लढत येथे झाली. या लढतीत भाजपसह स्थानिक सर्व पक्षांनी एकत्र येत येथे शेळकेंविरोधात आघाडी उघडली होती.
त्यामुळे या मतदारसंघात काँटे की टक्कर पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र,आता सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी 2019 च्या मताधिक्क्यातील निम्मं लीड 11 व्या फेरीतच कव्हर केले आहे. शेळके यांची मोठ्या मताधिक्क्याकडे वाटचाल सुरू आहे.
मावळ मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीपासूनच अजित पवारांचे (Ajit Pawar) उमेदवार सुनील शेळके यांनी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाली . ती आघाडी अकराव्या फेरीपर्यंत कायम राहिली. अकराव्या फेरीअखेर एकूण 1 लाख 04 हजार 263 मतांची मोजणी पूर्ण झाली असून सुनील शेळके यांना 75 हजार 449 तर अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना 26 हजार 758 मतं मिळाली आहे.
त्यात अजित पवार गटाचे सुनील शेळके 48,691 मतांनी आघाडीवर आहे. यामुळे ते मोठ्या मताधिक्क्याच्या विजयाकडे त्यांची घौडदौड सुरू असल्याचे दिसून येत आहे.बहुतांश राजकीय पक्षांनी अपक्ष बापू भेगडे यांना पाठिंबा दिल्याने मतदारसंघांमध्ये मावळ पॅटर्नची चर्चा चांगलीच चर्चा झाली होती.
मावळ मतदारसंघात 3 लाख 86 हजार 162 मतदार आहेत. त्यांपैकी दोन लाख 80 हजार 319 म्हणजेच 72.59 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला आहे. गेल्या निवडणुकीमध्ये मावळ विधानसभा मतदारसंघातून 71. 16% मतदान झाले होते यंदा मतदानाचा टक्का वाढला असून तब्बल 32,358 आधीचे मतदान झाले आहे. यामुळे वाढीव मतदान कोणाच्या पथ्यावर पडणारा याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
2019 च्या निवडणुकीत मावळ विधानसभा मतदारसंघात एकूण 3,48,581 मतदार होते.एकूण वैध मतांची संख्या 2,48,224 होती.या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शंकरराव शेळके विजयी होऊन आमदार झाले. त्यांना एकूण 1,67,712 मते मिळाली होती. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बाळा उर्फ संजय विश्वनाथ भेगडे हे एकूण 73,770 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांचा 93,942 मतांनी पराभव झाला होता.
साम टीव्ही च्या एक्झिट पोलमध्ये विद्यमान आमदार असलेले सुनील शेळके हे पुन्हा एकदा बाजी अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.मावळ मतदारसंघावर पूर्वी काँग्रेसचं वर्चस्व होतं. 1995 ते 2019 अशी सलग 24 वर्षे या मतदार संघावर भाजपचा वर्चस्व राहिलं. या कालावधीत भाजपचे तीन उमेदवार आमदार म्हणून निवडून आले.
2019 मध्ये मात्र इथे राष्ट्रवादीला यश मिळालं भाजपमधून ऐन निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत सुनील शेळके यांनी या ठिकाणी विजय मिळवला. मागील वेळी तब्बल 94 हजारेंनी हा विजय सुनील शेळके यांनी साकार केला होता.सलग दोन वेळेचे आमदार असलेले भाजपचे बाळा भेगडे यांचा त्यांनी पराभव केला होता. यंदाचं चित्रं मात्र थोडा वेगळा आहे.
बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरलेले बापू भेगडे यांना सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सध्या सुनील शेळके यांचं पारडं जरी जड वाटत असलं तरी मतमोजणी वेळी काहीतरी वेगळं चित्र दिसेल असा विश्वास येथील स्थानिक नेत्यांना असल्याचं पाहायला मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.