Maharashtra ATS News Sarkarnama
महाराष्ट्र

Pakistan Gangster Shahzad Bhatti: महाराष्ट्रात ATS ची मोठी कारवाई; शहजाद भट्टीच्या संपर्कातील संशयावरून 112 ठिकाणी एकाचवेळी छापे

ATS raids 112 locations across Maharashtra over suspected Shehzad Bhatti links : मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह राज्यभर शोधमोहीम; सोशल मीडियातून युवकांना जाळ्यात ओढण्याचा संशय, अनेकांची चौकशी सुरू.

Pradeep Pendhare

Summary

  • शहजाद भट्टी प्रकरणात महाराष्ट्र एटीएसची कारवाई

  • महाराष्ट्रात 112 संशयितांवर एटीएसचे छापे

  • सोशल मीडियाद्वारे युवकांशी संपर्क प्रकरण

  • पाकिस्तानातील कथित गँगस्टर शहजाद भट्टी

  • महाराष्ट्र एटीएस तपास ताज्या घडामोडी

Maharashtra ATS News : पाकिस्तानातील कथित गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याचा संशय असलेल्या महाराष्ट्रातील 112 जणांच्या ठिकाणांवर दहशतवादविरोधी पथकाने (ATS) शुक्रवारी एकाचवेळी छापे टाकून चौकशी सुरू केली.

या कारवाईत मुंबई, ठाणे, मिरा रोड, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, परभणीसह राज्यातील विविध भागांतील व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, शहजाद भट्टी सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून भारतीय युवकांशी संपर्क साधून त्यांना देशविघातक कारवायांसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आहे. या माहितीच्या आधारे केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि एटीएसने देशभरात त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू केला आहे.

या तपासाचा भाग म्हणून महाराष्ट्रातील (Maharashtra) 112 संशयित व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्या निवासस्थानी, कार्यालयांमध्ये आणि इतर ठिकाणी एकाचवेळी शोधमोहीम राबविण्यात आली. या सर्वांकडून चौकशी सुरू असून तपास पुढे सुरू आहे.

एटीएसच्या प्राथमिक माहितीनुसार, शहजाद भट्टी आणि त्याचे कथित साथीदार आबिद जाट, अजमल गुजर, हम्माद मेमन, राणा आणि अश्रफ बशीर हे सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांशी संपर्क साधत होते. धार्मिक भावना भडकवणे, पैसे व रोजगाराचे प्रलोभन देणे आणि त्यातून अमली पदार्थांची तस्करी, शस्त्र तस्करी तसेच भारताविरोधातील घातपाती कारवायांमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

तपासादरम्यान मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील 15 जण शहजाद भट्टी आणि त्याच्या कथित नेटवर्कच्या संपर्कात असल्याची बाब समोर आली आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील 10, धाराशिव आणि जालना जिल्ह्यातील प्रत्येकी दोन, तर बीड जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

अहिल्यानगरमध्ये दुसऱ्यांदा कारवाई

दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे महिनाभराच्या कालावधीत दुसऱ्यांदा एटीएसने कारवाई केली. या कारवाईत तीन ते चार संशयित युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

कोण आहे शहजाद भट्टी?

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, शहजाद भट्टी हा पाकिस्तानातील कथित गँगस्टर असून भारतात नेटवर्क उभारण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आहे. तसेच आबिद जाट सोशल मीडियाद्वारे युवकांशी संपर्क साधत असल्याचा, तर 'राणा' नावाच्या साथीदारावर युवकांची भरती आणि ऑनलाइन नेटवर्क वाढविण्याची जबाबदारी असल्याचा तपास यंत्रणांचा प्राथमिक अंदाज आहे. या सर्व बाबींची अधिक चौकशी सुरू आहे.

FAQs

1. शहजाद भट्टी कोण आहे?

उत्तर: तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, शहजाद भट्टी हा पाकिस्तानातील कथित गँगस्टर असून त्याच्याविरोधातील तपास सुरू आहे.

2. महाराष्ट्र एटीएसने कारवाई का केली?

उत्तर: शहजाद भट्टीच्या कथित संपर्कातील 112 संशयितांची ओळख पटल्याने एटीएसने शोधमोहीम राबवली.

3. किती जणांवर कारवाई झाली?

उत्तर: महाराष्ट्रातील 112 संशयितांच्या ठिकाणी शोधमोहीम आणि चौकशी करण्यात आली.

4. कोणत्या जिल्ह्यांमध्ये छापे टाकण्यात आले?

उत्तर: मुंबई, ठाणे, मिरा रोड, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, परभणीसह अनेक जिल्ह्यांत कारवाई झाली.

5. तपास पूर्ण झाला आहे का?

उत्तर: नाही. तपास सुरू असून यंत्रणांकडून पुढील चौकशी केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT