Ram Sutar sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Bhushan Award : मोठी बातमी! ज्येष्ठ शिल्पकार राम सुतारांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

Maharashtra Bhushan Award Ram Sutar : मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा केली. 25 लाख रुपये, मानपत्र व शाल, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Roshan More

Ram Sutar News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2024 च्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा केली आहे.ज्येष्ठ शिल्पकार यांना राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे. राम सुतार यांनी भारतातील सर्वाधिक उंच असणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ हा पुतळा घडवला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा केली. 25 लाख रुपये, मानपत्र व शाल, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राम सुतार यांनी संसदेच्या आवारतील राजीव गांधी, गोविंदवल्लभ पंत आणि जगजीवनराम, मौलाना आझाद, इंदिरा गांधी , राजीव गांधी अशा अनेक मूर्ती घडवल्या आहेत.फक्त भारतातच नव्हे तर युरोपातील अनेक देशांमध्ये देखील राम सुतार यांनी साकारलेली शिल्पं उभी आहेत.

कोण आहेत राम सुतार?

राम सुतार यांचा जन्म धुळ्यातील गोंडूर या गावी 19 फेब्रुवारी 1925 मध्ये झाला. त्यांनी मुंबईतील जेजे स्कूल ऑफ आर्टमधून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी सुरुवातील अजिंठा-वेरुळ येथील शिल्पांच्या डागडुजीचे आणि नंतर पंचवार्षिक योजनांचे लाभ सांगणारी लघुशिल्पे बनविण्याचे काम सरकारी नोकरीत राहून केले. पुढे 1960 मध्ये त्यांनी आपला स्वतंत्र स्टुडिओ उभारला.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी

महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च पुरस्कार आहे. 1996 मध्ये शिवसेना युती सरकारच्या काळात पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार पू ल देशपांडे यांना देण्यात आला होता. लता मंगेशकर, आशा भोसले, बाबासाहेब पुरंदरे, रतन टाटा, सचिन तेंडुलकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. गेल्यावर्षी अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT