
Nagpur News : विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. सोबतच काँग्रेसचा जनाधारही झपाट्याने घटत चालला आहे. हक्काचा ओबीसी मतदारही पक्षापासून दुरावत चालला आहे. तो का दूर होत आहे याचा शोध काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ घेत आहेत. या अंतर्गत ओबीसी समाजातील विविध जातींच्या प्रतिनिधींसोबत ते बैठका घेऊन चर्चा करत आहेत.
लोकसभे वेळी काँग्रेसह महाविकास आघाडीला चांगले यश आले होते. पण विधानसभेवेळी म्हणावे तसे यश मिळाले नाही. काँग्रेससह शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची धुळधान उडाली. काँग्रेसच्या हातातून आता पारंपारीक मतदारही निसटत चालला आहे. यावरून काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ अॅक्टीव्ह झाले आहेत. त्यांनी ओबीसी समाजातील नेत्यांची म्हणणे ऐकूण घेत नाराजीचे कारणे जाणून घेतली आहेत.
नुकतीच त्यांनी माळी समाजाच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. यात प्रामुख्याने माळी समाजाला काँग्रेसने आजवर कुठल्याच निवडणुकीत पुरेस प्रतिनिधित्व दिले नसल्याची नाराजी सर्वांनीच बोलून दाखवली. वारंवार दुर्लक्ष केले जात असल्याने आज माळी समाज भाजपकडे झुकल्याचेही या बैठकीतून निदर्शनास आले.
सपकाळ यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या मुंबई कार्यालयात ही बैठक झाली. बैठकीला प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी म्हाडा सभापती किशोर कन्हेरे, माजी आमदार दिप्तीताई चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील, जेष्ठ नेते शंकरराव लिंगे, अविनाश उमरकर, संजय ठाकरे, नंदकिशोर नगरकर, प्रकाश तायडे, डॉ सदानंद धनोकार, महेश गणगणे, अजय तायडे, प्रा. गजानन खरात, विजयराव महाजन, तुकाराम माळी, प्रशांत सुरसे, सुरेंद्र उगले, प्रमोदभाऊ चिंचोळकर, गणेश राऊत बिड, नीलेश हाडोळे, सुनील शिंदे, शशांक केंढे, अशोक इंगळेर, गणेश माळी आदी प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माळी समाज हा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व संत परंपरा मानणारा असल्याचे सांगितले. काँग्रेस हाच समतेचा व सर्वधर्म समभावाचा विचार घेऊन पुढे जात आहे. त्यामुळे माळी समाज बांधवांनी काँग्रेस पक्षासोबत यावे असे आवाहन केले. समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय हक्कांसाठी एकजूट होऊन माळी समाजाच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे आणि प्रत्येक घटकाच्या हक्कांसाठी पुढे राहील असे आश्वासन त्यांनी दिले.
किशोर कन्हेरे यांनी यावेळी माळी समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात महानगर पालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत, विधानसभा, निवडणुकीत सामाजिक क्षेत्रांत काम करणाऱ्या युवकांना योग्य प्रतिनिधित्व येत्या काळात द्यावे, अशी विनंती केली. समाजातील कार्यकर्त्यांना जिल्हा, तहसील पातळीवर काँग्रेसच्या विविध पदांवर कमिट्यांवर सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावे अशी सूचना केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.