Maharashtra Legislative Council nominations for ZP and Corporation winners Sarkarnama
महाराष्ट्र

opposition boycott tea party: राज्य सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार; भास्कर जाधव म्हणाले, 'सत्ताधारी पक्षाचे वर्तन संविधानाचा आदर करणारे नाही'

Maharashtra budget session News : सत्ताधारी पक्षाचे वर्तन संविधानाचा आदर करणारे नाही. त्यामुळे चहापानाला न जाण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत राज्य सरकारची भूमिका संदिग्ध राहिली आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चहापानावर विरोधकानी बहिष्कार टाकला आहे. सरकारच्या चहापानांवर आम्ही बहिष्कार टाकला असल्याचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले. सत्ताधारी पक्षाचे वर्तन संविधानाचा आदर करणारे नाही. त्यामुळे चहापानाला न जाण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत राज्य सरकारची भूमिका संदिग्ध राहिली आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते बैठकीस उपस्थित होते.

यावेळी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी राज्यात शेतकरी आत्महत्याच्या घटना वाढत असताना राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफी करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तर दुसरीकडे राज्यातील महिला भगिनींना गेल्या दोन महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जात नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्याची बैठक पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी पार पडली. या वेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते व काँग्रेसचे नेते या बैठकीस हजर होते. यावेळी त्यांनी राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरु होत असल्याने याबाबत विरोधकांची रणनीती या बैठकीत ठरविण्यात आली.

गेल्या काही दिवसापासून राज्य सरकारने दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते निवडीबाबत गळचेपी भूमिका घेतली आहे. सत्ताधारी पक्षाकडे मोठे बहुमत असताना विरोधी पक्षनेता निवडत नसल्याने महायुती सरकारच्या कारभारावर यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT