BJP Politics: नाशिकमध्ये भाजप विरुद्ध भाजप संघर्षाची ठिणगी; आमदार देवाभाऊंचा दरबार गाठण्याच्या तयारीत!

Nashik BJP Vs BJP Politics NMC Corporators challenge MLAs' work-पहिल्याच महासभेत नगरसेवकांनी दिला आमदारांना झटका; आमदारांची होणार कोंडी?
Eknath shinde & Devendra Fadanvis
Eknath shinde & Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Nashik NMC News: नाशिक महापालिकेत भाजप स्वबळावर सत्तेत आला आहे. महापालिकेच्या पहिल्याच महासभेत भाजपच्या नगरसेवकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. आमदारांच्या मंजूर कामांवरून नवा वाद या निमित्ताने पुढे आला. 

नुकत्याच झालेल्या महासभेत नगरसेवकांनी आमदारांच्या कार्यशैलीवर गंभीर आक्षेप नोंदवले. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नगरसेविका भारती ताजनपुरे यांनी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या कामांबाबत तक्रारी केल्या. त्यामुळे देवळालीतील शिवसेना ठाकरे पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष महासभेत प्रकट झाला. 

शहरातील आमदारांच्या कामांना एनओसी देण्याचा विषय नगरसेवकांनी उपस्थित केला. त्यात भाजपच्या नगरसेवकांचा पुढाकार होता. आमदारांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केल्यास महापालिकेने एनऒसी देऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

Eknath shinde & Devendra Fadanvis
Sanjay Raut Politics: भुसे विरुद्ध राऊत खटल्यात समझोता, मात्र जाता जाता राऊत यांनी भाजपला गुंडाळले!

आमदार आणि खासदार निधीतील विकास कामे करावयाचे असल्यास ती महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात यावी. महापालिकेत नगरसेवक सत्तेत आले आहेत. आपल्या प्रभागात कोणती कामे व्हावीत याबाबत नगरसेवकांच्या मताला किंमत दिली जावी, असा तक्रारीचा सूर नगरसेवकांनी लावला होता. 

Eknath shinde & Devendra Fadanvis
BJP Politics: `पक्षांतर` फळलं की नडलं? भाजपच्या `कमळा`त जाताच हॉटेलवर पालिकेचा `बुलडोझर`!

राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार सत्तेत आहे. शहरातील तिन्ही आमदार भाजपचे आहेत. कुठे आमदार या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आहेत. आमदार निधीतून महापालिका हद्दीत विविध कामे केली जातात. या कामांच्या वर्चस्वावरून हा वाद निर्माण झाला आहे. 

विकास कामे आणि त्यावर खर्च होणाऱ्या निधी यामध्ये आमदार आणि नगरसेवक यांचे काय हितसंबंध असतात हे सर्वश्रुत आहे. या आर्थिक वर्चस्ववादातूनच महासभेत नव्यावादाला तोंड फुटले आहे. यानिमित्ताने शहरात नगरसेवक आणि आमदार यांच्यात वर्चस्ववादाचा संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. 

निमित्ताने भाजप विरुद्ध भाजप अशी राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे दुखावलेले आमदार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे कळते. नगरसेवक विरुद्ध आमदार हा वाद आता थेट मुख्यमंत्री फडणवीसांच्या दरबारी पोहोचणार आहे. त्यात पुढे काय निर्णय होतो? याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. 

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com