Shivsena VS BJP : शिवसेना नेत्याचा भाजपवर मोठा आरोप; 25 लाख देऊन राष्ट्रवादी नगरसेवकाला फोडले

Solapur Corporation Sabha : सोलापूर महापालिकेच्या पहिल्याच सभेत स्वीकृत नगरसेवक निवडीवरून गोंधळ उडाला. भाजपने आठ नावे जाहीर केल्याने शिवसेना व काँग्रेसने आक्षेप घेतला. शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे यांनी भाजपवर पैसे देऊन नगरसेवक फोडल्याचा आरोप केला आहे.
Amol Shinde
Amol ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 20 February : सोलापूर महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून अभूतपूर्व गोंधळ झाला. भाजपकडून नऊच्या ऐवजी आठच नावे जाहीर केली आहेत. त्यावरून शिवसेनेचे गटनेते, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आणि काँग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे यांनी भाजपला धारेवर धरले. त्या गोंधळातच महापौर विनायक कोंड्याल यांनी सभागृह तहकूब केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अमोल शिंदे यांनी भाजपवर मोठा आरोप केला. भाजपने चालबाजी करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला २५ लाख रुपये देऊन आपल्या बाजूला वळविले, असा गंभीर आरोप केला आहे.

शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे (Amol Shinde) म्हणाले, भारतीय जनता पक्षाने कालच चालबाजी करून वैभव हत्तुरे यांना २५ लाख रुपये देऊन त्यांची नगरसेवकांची संख्या ८८ वर नेली, त्यामुळे भाजपच्या वाट्याला स्वीकृत नगरसेवकाच्या नऊ जागा आल्या. मात्र, भाजपने त्या सर्व नऊ जागा जाहीर करण्याऐवजी केवळ सातच नावं जाहीर केली आहेत, असा दावाही शिंदे यांनी केला.

सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपचे (BJP) ८७ नगरसेवक आहेत. त्यांना वाटत होतं की आपल्याला सातच जागा मिळतील, पण नगरसेवक वैभव हत्तुरे यांना २५ लाख रुपये देऊन त्यांचा पाठिंबा घेतला. वास्तविक ते भाजप उमेदवाराच्या विरोधात लढले, त्या ठिकाणी भाजप उमेदवाराचा पराभव करून ते निवडून आले आहेत. सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी त्यांना गाडीत घेऊन गेले. आमदारांपाशी बसवले. त्या ठिकाणी पैशाची थैली मिळाल्यावरच मग ते त्यांच्यासोबत गेले. ठीक आहे, कोणी कुठे जायचे याचा प्रत्येकाला अधिकार आहे, असेही शिंदे यांनी नमूद केले आहे.

Amol Shinde
BJP Nominated Corporator : सोलापूर भाजपच्या बहुचर्चित स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर; शहराध्यक्षांसह पाच निष्ठावंतांना संधी

ते म्हणाले, सोलापूर शहराचे प्रश्न मांडायला आम्हाला जनतेने महापालिकेत पाठविले आहे, त्या भूमिकेवर आम्ही ठाम राहू. आम्ही कोणत्याही सदस्याला सोबत आणण्याचा प्रयत्न केलेला नाही. आम्ही निवडणुकीत जरी राष्ट्रवादीसोबत एकत्र असलो तरी आमच्या चार सदस्यांवर आम्हाला स्वीकृत मिळत नव्हतं, हे आम्हाला माहिती होतं. त्यामुळे आम्ही कोणालाही सोबत घेण्याचा प्रयत्न केलेला नाही.

Amol Shinde
Solapur Corporation : सोलापुरात ‘स्वीकृत’वरून प्रचंड गोंधळ; नाव कट झालेल्या भाजप इच्छुकाचा आत्महत्येचा इशारा, अमोल शिंदेंना मेसेज

नगरसेवक शिंदे म्हणाले, आमच्या म्हणण्यानुसार सातच नावं अंतिम आहेत. आठवं आणि नववं नाव जेव्हा येईल, तेव्हा आम्ही कोर्टात जाऊ. आज जी नावं वाचली आहे, तीच नावं फायनल असतील. परिवहन समितीची नावे त्यांना जाहीर करता आली नाहीत, असाही दावा शिंदे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com