Maharashtra Cabinet Expansion : नागपूरमध्ये मंत्र्यांच्या शपथविधीसाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहे. दुपारनंतर राजभवनात मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. शपथविधीसाठी फोन न आल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे. आज (रविवारी) सकाळी मंत्रिपदाबाबतची अनिश्चितता कायम होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिपदाच्या शपथेसाठी नरहरी झिरवाळ, इंद्रनील नाईक यांना फोन गेल्याची माहिती आहे.
सोमवारपासून (ता.16) नागपूरमध्ये अधिवेशन सुरू होणार आहे. पाच डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर, अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर दहा दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार होतो आहे. या मंत्रिमंडळात अजित पवार यांच्या वाट्याला 10 मंत्रिपदे तर एकनाथ शिदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला 12 मंत्रिपदे येण्याची शक्यता आहे.
भाजपचे मंत्रिमंडळामध्ये वर्चस्व असणार आहे.भाजपच्या वाट्याला 21 मंत्रिपदे येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणाला संधी देणार हे अजुनही गुलदस्त्यात आहे. पुणे शहराला दोन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता असून कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात आहे. तर, माधुरी मिसाळ आणि भिमराव तापकीर यांच्यामध्ये कोणाला संधी मिळणार याविषयी उत्सुकता आहे.
भाजप, शिवसेनेच्या मंत्रिपदांची नावे समोर आली नाहीत. मात्र, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नरहरी झिरवळ, आदिती तटकरे, इंद्रनील नाईक यांना मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती आहे. या तिघांची नावे निश्चित असून अनिल पाटील, दत्तात्रेय भरणे, सना मलिक यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.