Sanjay Rathod and Tushar Rathod News: मंत्रिमंडळात यंदा संजय की तुषार यापैकी कुठल्या राठोडांचा होणार समावेश?

Mahayuti Goverment Cabinet Expansion : रविवारी नागपूरध्ये राजभवनात मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला असला तरी अद्याप मंत्र्यांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही.
Sanjay Rathod and Tushar Rathod
Sanjay Rathod and Tushar RathodSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Goverment Cabinet Expansion News : महायुतीने सरकार स्थापन केले असले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला न नाही. रविवारी नागपूरध्ये राजभवनात मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला असला तरी अद्याप मंत्र्यांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली नसल्याने अनेकांची धाकधून वाढली आहे.

भाजपने वादग्रस्त मंत्र्यांना मंत्रिमंडळात समावेशास नकार दिला आहे. त्या फटका यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते व माजी मंत्री संजय राठोड यांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे बंजार समाज नाराज होऊ नये यासाठी भाजपने डॉ. तुषार राठोड यांचा चेहरा पुढे केला जात असल्याचे समजते.

महाविकासआघाडी आणि महायुतीच्या कार्यकाळात संजय राठोड(Sanjay Rathod) मंत्री होते. मात्र एका प्रकरणात त्यांचे नाव पुढे येताच भाजपच्यावतीने मोठा गदारोळ करण्यात आला होता. राठोडांना मंत्रिमंडळातून वगळण्याची मागणी केली होती. मात्र यानंतर हेच राठोड यांना भाजप महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री झाले. त्यामुळे अळीमळी गळीचूप अशी अवस्था भाजपच्या नेत्यांची झाली होती.

Sanjay Rathod and Tushar Rathod
Narhari Zirwal and Aditi Tatkare : मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी राष्ट्रवादीकडून नरहरी झिरवळ अन् आदिती तटकरेंना फोन!

त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी भाजपचा विरोध झुगारून लावला होता. आता मंत्रिमंडळ नेमण्याचे सर्वाधिकार भाजपकडे आले आहे. हे बघता संजय राठोड यांना डच्चू देण्याचे जवळपास ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनीसुद्धा महायुतीच्या नेत्यांना मंत्रिमंडाळात स्वच्छ प्रतिमेच्या आमदारांचा समावेश करण्यास सांगितले आहे. त्यामुळे अनेक वादग्रस्त मंत्र्यांना बाहेर बसावे लागणार अल्याचे दिसून येते.

शिवसेनेमुळे यवतमाळ जिल्ह्यात भाजपचा(BJP) अद्यापही आपली ताकद उभी करता आली नाही. लोकसभेच्या निवडणुकीतही पराभव महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला. वादग्रस्त ठरल्यानंतरही संजय राठोड पुन्हा निवडून आले आहेत. विदर्भातील यवतमाळसह मराठवाड्याता बंजारा समाजाची संख्या लक्षणीय आहे. ती आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न आता भाजपच्यावतीने केला जात आहे.

Sanjay Rathod and Tushar Rathod
Devendra Fadnavis News : म्हणून मुख्यमंत्री झालेले फडणवीस परत म्हणाले,'मी पुन्हा येईन..मी पुन्हा येईन आणि..'

याकरिता संजय राठोड यांना पर्यात म्हणून मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांच्यामागे ताकद उभी केली जात असल्याचे सांगण्यात येते. त्यांना बंजारा समाजाची मान्यता आहे. याचा फायदा घेऊन तुषार राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करून त्यांना बळ दिले जाणार असल्याची चर्चा आहे. तुषार राठोड मंत्रिमंडाळात आले तर संजय राठोड यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com