Nanded Crime News : पुणे, बीड,परळीनंतर आता नांदेड..! ठाकरे शिवसेनेच्या शहरप्रमुखाचं अपहरण,पण...

ShivsenaUBT Leader Gaurav Kotgire Kidnapped News : नांदेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहर प्रमुखाचे अपहरण शुक्रवारी (ता.12) करण्यात आले. ही अपहरण झाल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेत नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू केला.
Gaurav Kotgire .jpg
Gaurav Kotgire .jpgSarkarnama
Published on
Updated on

Nanded News : भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातून ही एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचीही अपहरण करून हत्या करण्यात आली. तसेच परळीतही एका भाजप नेत्याच्या मुलाचे खंडणीसाठी झालेले अपहरण या घटनांनी महाराष्ट्राचं राजकारण तापलं असतानाच आता नांदेडमध्ये(Nanded) एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

नांदेडमध्ये शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहर प्रमुखाचे अपहरण शुक्रवारी (ता.12) करण्यात आले. ही अपहरण झाल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेत नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू केला.

या दरम्यान, चंदा सिंग कॉर्नर येथे काहीवेळाने गौरव कोटगिरे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी कोटगिरे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. त्यावरून इतवारा पोलीस चौकीत अज्ञात पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाहन खरेदी -विक्रीच्या व्यवहारातून हे अपहरण करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Gaurav Kotgire .jpg
Devendra Fadnavis : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्यमंत्री फडणवीसांनी पुण्यातून दिले 'हे' आदेश

गौरव कोटगिरे यांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासून कोटगिरे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे. नांदेड गुन्हे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. या आरोपींकडून टाटा सफारी चार चाकी वाहन आणि खंजर अशी हत्यारे जप्त करण्यात आली आहे.

याप्रकरणी नांदेड ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास गौरव कोटगिरे बाफना टी पॉइंट येथील एका गॅरेजमध्ये आपल्या कारची दुरुस्ती करण्यासाठी गेले होते. तिथे अचानक एका सफारी गाडीतून आलेल्या चार-पाच जणांनी कोटगिरे यांना जबरदस्तीने गाडीत बसून नेले. ही माहिती कोळी यांच्या ड्रायव्हरने नातेवाईकांना दिली.या घटनेची माहिती समजताच परिसरात एकच खळबळ उडाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com