महाराष्ट्रात लवकरच १४०० डॉक्टरांची भरती केली जाणार आहे.
ग्रामीण व आदिवासी भागातील रुग्णालयांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
डॉक्टरांचे मानधन वाढवण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली.
maharashtra hospitals : राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील रुग्णालयाबाबत अनेकदा तक्रारी येत असतात. डॉक्टर्स आणि तज्ज्ञ डॉक्टर्संचा असलेला अभाव आणि नादुरूस्त अवस्था यामुळे योग्य उपचार मिळत नाहीत. तर गर्भवती महिलांची मोठी गैरसोय होते. त्यांना वाड्या वस्त्यांवरून झोळीत घालून कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागते. यात योग्य उपचार वेळेत मिळाले तर ठीक अन्यथा त्या महिलेला जीव ही गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. यावरून विधान परिषदेत प्रश्न उपस्थित झाला. ज्यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी राज्यातील नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी लवकरच १४०० डॉक्टरांची भरती केली जाईल अशी घोषणा केली. तसेच आदिवासी भागातील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर आणि तज्ज्ञ डॉक्टर्सही नेमण्याबरोबरच त्यांचे मानधन वाढविण्याला प्राधान्य देऊ अशीही घोषणा केली आहे.
राज्यातील नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी रुग्णवाहिका सुरू केल्या आहेत. पण ज्या पद्धतीने ग्रामीण आणि आदिवासी भागातील ग्रामीण रुग्णालयाने एकतर नादुरूस्त अवस्थेत असतात किंवा तेथे डॉक्टर आणि तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध नसतात. तशीच अवस्था रुग्णवाहिकासंदर्भात आहे.
रुग्णवाहिकेतही डॉक्टर आणि तज्ज्ञ डॉक्टर्स नसतात. याच संदर्भात काँग्रेस आमदार राजेश राठोड यांनी विधान परिषदेत नियम ९३ अन्वये प्रश्न उपस्थित करत चर्चा घडवून आणली. या चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर बोलत होते.
यावेळी आबिटकर यांनी, राज्यातील नागरिकांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी लवकरच १४०० डॉक्टरांची भरती केली जाईल. विशेष करून आदिवासी भागातील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर आणि तज्ज्ञ डॉक्टर्सही नेमले जातील. त्यांचे त्यांचे मानधनही वाढवण्यावर भर दिला जाईल अशी घोषणा केली.
याचबरोबर मंत्री आबिटकर यांनी विशेषत: आदिवासी भागातील डॉक्टरांचे मानधन वाढविण्यासह इतर गोष्टींना प्राधान्य दिले असून त्यांना गती देऊन मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी दिली.
दरम्यान त्यांनी १०२ नंबरच्या रुग्णवाहिका या आता १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेप्रमाणेच काम करेल असे सांगताना या रुग्णवाहिकांचा आपतकालीन परिस्थितीतही वापर केला जाईल, अशी माहिती दिली.
तसेच कोणत्याही रुग्णवाहिका बंद पडणार नाही याची दक्षता प्रशासन घेत असून रुग्णवाहिकांसाठी चालक उपलब्ध करण्यासाठी नियोजन पद्धतीने कार्यवाही करण्यात येईल असेही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले आहे.
1. किती डॉक्टरांची भरती होणार आहे?
सुमारे १४०० डॉक्टरांची भरती करण्यात येणार आहे.
2. कोणत्या भागांना प्राधान्य दिले जाणार आहे?
ग्रामीण आणि आदिवासी भागातील रुग्णालयांना प्राधान्य दिले जाणार आहे.
3. मानधनाबाबत काय निर्णय घेतला आहे?
डॉक्टरांचे मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
4. ही घोषणा कोणी केली?
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली.
5. या भरतीचा उद्देश काय आहे?
नागरिकांना तातडीने आणि चांगले आरोग्यसेवा मिळाव्यात हा उद्देश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.