Prakash Abitkar : कोल्हापूर-इचलकरंजीमध्ये महायुतीची 'स्ट्रॅटेजी' देणार विरोधकांना हादरा?; अबिटकरांनी सांगितला उपमुख्यमंत्र्यांचा 'तो' नवा 'फॉर्म्युला'

Prakash Abitkar reveals the Deputy Chief Minister’s political strategy : प्रकाश अबिटकरांनी उपमुख्यमंत्र्यांची रणनीती स्पष्ट करत कोल्हापूर व इचलकरंजीत महायुतीचा नवा फॉर्म्युला मांडला, या स्ट्रॅटेजीमुळे विरोधकांना बसणार हादरा?
Prakash Abitkar
Prakash Abitkarsarkarnama
Published on
Updated on

आज सायंकाळी चार वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी राज्यातील 28 महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडी कडून त्याची जय्यत तयारी सुरू आहे. अशातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजी येथे येऊन विकास कामांचा उद्घाटन समारंभ केला. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरातील महायुती म्हणून निवडणुकीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्लॅन काय? याबाबत स्थानिक नेत्यांना काय सूचना दिल्या आहेत, त्याचे स्पष्टीकरण पालकमंत्री आबिटकर यांनी दिले आहे.

Prakash Abitkar
Nitin Nabin : मोदी-शाहांचा 'मास्टर स्ट्रोक', सगळे अंदाज फेल ठरवणारे नितीन नबीन कोण? राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष निवडीमुळे संघ नाराज?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील महायुती म्हणून लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. तशा पद्धतीच्या सूचना आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर शहर आणि इचलकरंजी शहर या ठिकाणी शिवसेनेची बांधणी मोठी आहे. त्या पद्धतीने कार्यकर्त्यांची तयारी देखील झाली आहे. महायुतीतील घटक महायुतीच्या घटक पक्षांची चर्चा करून समन्वयाने त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण पालकमंत्री आबिटकर यांनी दिली आहे.

निवडणूक घोषित होईल याचं स्वागतच करावा लागेल. कारण कार्यकर्त्यांची इच्छा आहे. या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्या. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही महानगरपालिकेमध्ये महायुती व्हावी असा आमचा प्रयत्न सुरू आहे. महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी महायुती करण्याबाबतच्या सूचना संपूर्ण राज्यभर दिल्या आहेत, असेही पालकमंत्री आबिटकर म्हणाले.

Prakash Abitkar
CM Fadnavis visit : CM फडणवीसांच्या दौऱ्यासाठी वाहतूक वळवली; बदललेल्या रस्त्याने घेतला शिक्षिकेचा बळी?

पाच वर्ष प्रशासक राज

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक ही 2016 साली झाली होती. 2021मध्ये कार्यकाळ संपल्यानंतर तेव्हापासून कोल्हापूर महानगरपालिकेवर प्रशासक राज सुरू आहे. त्यामुळे शहराच्या विकास कामांना खेळ बसली आहे. तर इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक ही पहिल्यांदाच होत आहे. दोन वर्षांपूर्वी इचलकरंजी महानगरपालिका घोषित करण्यात आली आहे. पहिलीच निवडणूक होत असल्याने चुरस वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com