Devendra Fadnavis  Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra E-challan news : ई-चलन वसुलीतील पोलिसांच्या गैरप्रकारांवर सरकार घालणार मोठा घाव; थेट गृह विभागातून निघाला आदेश...

Police irregularities India, Traffic fine system Maharashtra : अभ्यास गटामध्ये गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष), माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव, वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक, परिवहन आयुक्त आणि वाहतुक विभागाचे पोलीस सह आयुक्त हे सदस्य असतील.

Rajanand More

Home Department order Maharashtra : महाराष्ट्रात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहनचालकांनी ई-चलनामार्फत दंड आकारला जातो. अनेकदा ई-चलन वसुलीत गैरप्रकार झाल्याच्या तक्रार समोर आल्या आहेत. विधानपरिषदेतही हा मुद्दा चर्चेला आला होता. त्यावरील तारांकित प्रश्नाला उत्तर देताना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांवर कारवाई व ई-वसुलीच्या पध्दतीत सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते.

मागील वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात ई-चलन तयार करताना खाजगी मोबाईल फोन वापरणाऱ्या संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावरील चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले होते. त्यांनी याबाबत अभ्यास गट स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते.

ई-चलन वसुलीसंदर्भात निश्चितपणे तंत्रज्ञानाचा वापर करून त्या व्यक्तीचा मागोवा घेतला जाईल व त्या व्यक्तीला कठोरपणे शिक्षा दिली जाईल. यासंदर्भात वेगवेगळ्या देशांतील किंवा राज्यांतील याबाबत वापरल्या जाणाऱ्या पध्दतीचा अभ्यास करण्यात येईल. तसेच महसूल वाढीचे लक्ष पूर्ण करण्यासाठी ई-चलनाचा पोलिसांमार्फत गैरवापर होणार नाही, याचा अभ्यास करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अभ्यास गट स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते.

त्यानुसार गृह विभागाकडून अभ्यास गट स्थापन करण्यात आला असून त्याबाबतचा शासन निर्णय बुधवारी जारी करण्यात आला. या अभ्यासगटाकडून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांच्या अनुषंगाने शिफारशी केल्या जातील. गृह विभागाचे अपर मुख्य सचिव या समितीचे अध्यक्ष असतील. तर सह सचिव किंवा उपसचिव सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

अभ्यास गटामध्ये गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष), माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव, वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक, परिवहन आयुक्त आणि वाहतुक विभागाचे पोलीस सह आयुक्त हे सदस्य असतील. ई-चलन वसुलीकरिता तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजना व दंडात्मक शिक्षा करण्याबाबत इतर देशातील व राज्यातील पध्दतींचा अभ्यास करून शासनास शिफारसी करण्याची जबाबदारी या अभ्यास गटावर असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT