Ex CJI Bhushan Gavai News : माजी CJI गवई यांचा बागेश्वर धाममधील फोटो व्हायरल; एक शब्दही न बोलता प्रकाश आंबेडकरांनी असा साधला निशाणा...

Prakash Ambedkar reaction, former CJI India news : प्रकाश आंबेडकर संपादक असलेल्या प्रबुध्द भारत या पोर्टलवर राजेंद्र पातोडे यांचा लेख प्रसिध्द झाला आहे. तो लेखही आंबेडकरांनी सोशल मीडियात रिशेअर केला आहे.
Former CJI Bhushan Gavai’s visit to Bageshwar Dham.
Former CJI Bhushan Gavai’s visit to Bageshwar Dham.Sarkarnama
Published on
Updated on

Former CJI Bhushan Gavai viral photo : माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकतीच मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम सरकार येथे भेट दिली. त्यांनी तिथे धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचीही भेट घेतली. गवई कुटुंबांने यावेळी बागेश्वर बालाजीचे दर्शन घेत पूजन-अर्चनही केले. या भेटीचे फोटो आता सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले आहेत.

सरन्यायाधीश असताना गवई यांनी एका मंदिराच्या पुनर्निमाणाच्या याचिकेवर केलेल्या विधानानंतर वाद निर्माण झाला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टात एका वकिलाने त्यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली होती. या वकिलाने सरन्यायाधीशांच्या विधानाचा संदर्भ दिला होता. हे प्रकरणही चांगले गाजले होते. पण गवई यांनी अधिकृतपणे तक्रारी दिली नाही.

यापार्श्वभूमीवर माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कुटुंबासह घेतलेली धीरेंद्र शास्त्री यांची भेट चर्चेत आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या भेटीवर थेट प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांनी सोशल मीडियातील याविरोधातील काही पोस्ट रिशेअर करत आपली भूमिका अप्रत्यक्षपणे स्पष्ट केली आहे.

Former CJI Bhushan Gavai’s visit to Bageshwar Dham.
CP Radhakrishnan news : भाजपची निवडणूक आयोगाकडे धाव, त्यातच उपराष्ट्रपती थेट समोरासमोरच भडकले; खर्गे अडचणीत...

प्रकाश आंबेडकर संपादक असलेल्या प्रबुध्द भारत या पोर्टलवर राजेंद्र पातोडे यांचा लेख प्रसिध्द झाला आहे. तो लेखही आंबेडकरांनी सोशल मीडियात रिशेअर केला आहे. या लेखाची सुरूवात आंबेडकरी वारसा सांगणाऱ्या न्यायमूर्तींचे वैचारिक अध:पतन, अशी करण्यात आली आहे.

काय म्हटले आहे लेखात?

बी. आर. गवई यांनी नुकतीच सहकुटुंब बागेश्वर धामला दिलेली भेट आणि तिथल्या ‘भोंदूगिरी’चे केलेले उदात्तीकरण हे याचेच ताजे आणि दुर्दैवी उदाहरण आहे. न्यायमूर्ती गवई ज्या पदावर बसले होते, ते पद संविधानाच्या रक्षणाचे आहे. अशा जबाबदार पदावरील व्यक्तीने जेव्हा ‘अंधश्रद्धेचे माहेरघर’ समजल्या जाणाऱ्या बागेश्वर धामसारख्या ठिकाणी जाऊन विधी-विधान करणे, हे केवळ वैयक्तिक श्रद्धेचा भाग उरत नाही. हा त्या उच्च पदाचा आणि ज्या आंबेडकरी चळवळीतून ते इथपर्यंत पोहोचले, त्या विचारांचा अपमान आहे, असे लेखात म्हटले आहे. 

Former CJI Bhushan Gavai’s visit to Bageshwar Dham.
Manoj Naravane book : जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून संसदेत रणकंदन, आता आणखी एक पुस्तक; शशी थरूर ठरले कारणीभूत...

आंबेडकरी जनतेने अशा घटनांकडे गांभीर्याने पाहून, बोध घेतला पाहिजे. आम्ही सातत्याने सांगत आहोत की रा सु गवई, राजेंद्र गवई आणि भूषण गवई ह्यांनी आंबेडकरी चळवळीला मातीत घालण्याचे कामच केले आहे. त्यावर आरक्षण उपवर्गीकरण निकाल असो की आताचे भोंदू बाबा चरणी लोटांगण, गवई एक टक्के देखील संविधानवादी आणि आंबेडकरी विचाराचे नाहीत हेच सिद्ध झाले आहे, अशी खरमरीत टीका लेखातून करण्यात आली आहे.  

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री हे सातत्याने भारताला ‘हिंदू राष्ट्र’ घोषित करण्याची मागणी करत असतात. त्यांचे ‘हिंदू गाव’ संकल्पनेचे मॉडेल हे थेट भारतीय संविधानातील ‘धर्मनिरपेक्षता’ आणि ‘सर्वधर्मसमभाव’ या तत्त्वांना सुरुंग लावणारे आहे. ज्या संविधानाची शपथ घेऊन न्यायमूर्ती गवई यांनी न्यायदानाचे कार्य केले, त्याच संविधानाला आव्हान देणाऱ्या शक्तींसोबत ते पीठावर बसून काय साध्य करत आहेत? ‘हिंदू गाव’ बनवण्याच्या नावाखाली जे सामाजिक ध्रुवीकरण केले जाते, त्याला न्यायमूर्तींच्या उपस्थितीमुळे एक प्रकारचे ‘सामाजिक अधिमान्यता’ मिळते, जे अत्यंत घातक आहे, असेही लेखात म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com