Mahavikas Aghadi | Mahayuti  Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Election LIVE vote Counting : पहिल्या टप्प्यात महायुतीची आघाडी, 'मविआ'ची धाकधूक वाढली

Maharashtra Election Results 2024 LIVE Counting : मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात महायुती आणि महाविकास आघाडीच तीव्र स्पर्धा दिसून आली. महायुतीचे पारडे थोडेसे जड वाटले. महायुतीतील अजितदादा पवार यांच्या पक्षाची मोठी पीछेहाट होणार, असे एक्झिट पोलचे अंदाज होते, मात्र ते अंदाज चुकीचे आहेत, असे चित्र सुरुवातीच्या टप्प्यात दिसत होते.

अय्यूब कादरी

Maharashtra Election Results 2024 LIVE Counting : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला शनिवारी सकाळी 8 वाजता सुरवात झाली. पोस्टल मतांनंतर मतदानयंत्रांतील मतांची मोजणी सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात महायुतीला आघाडी मिळत असल्याचे दिसून येत होते. महायुतीच्या उमेदवारांनी 175 जागांवर आघाडी घेतली होती.

दुपारी 12 च्या नंतर चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या टप्प्यात महायुतीला आघाडी मिळाल्यामुळे महाविकास आघाडीची धाकधूक वाढली होती. या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीसह महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सकाळी 10 पर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीत स्पर्धा सुरू असल्याचे चित्र होते.

काही जागांवर अपक्षांनाही आघाडी घेतली होती. हे आकडे मिनिटामिनिटाला बदल होते. त्यामुळे नेते आणि कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली होती. महायुती आणि महाविकास आघाडीत स्पर्धा तीव्र होताना दिसत होती. राज्याचे लक्ष लागलेल्या मराठवाड्यातील लातूर शहर मतदारसंघात काँग्रेसचे अमित देशमुख हे सुरुवातीच्या टप्प्यावर आघाडीवर होते. लातूर ग्रामीणमधून त्यांचे बंधू धीरज देशमुख हेही आघाडीवर होते. (Vidhan Sabha Election 2024 result live news)

पोस्टल मतदानात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) हेही पिछाडीवर गेले होते. मतदानयंत्रे उघडल्यानंतर अजितदादांनी आघाडी घेतली. अनेक प्रमुख नेत्यांच्या बाबतीत असेच चित्र होते. मतदानानंतर जाहीर झालेल्या सहा एक्झिट पोलमध्ये महायुती, तर चार एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीला बहुमत मिळणार असे निष्कर्ष काढण्यात आले होते.

एका एक्झिट पोलमध्ये त्रिशंकू विधानसभेचा निष्कर्ष काढण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मतमोजणीबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. गेल्या पाच वर्षांतल विविध राजकीय घडामोडींमुळे या निवडणुकीला मोठे महत्व प्राप्त झाले होते. मतदानाचा टक्काही वाढला आहे. महिलांचे मतदान वाढले आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महिलांचे मतदान वाढले असून, त्याचा फायदा आम्हालाच होणार, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला होता.

सरकार स्थापन झाले तर महिलांना दरमहा 3100 रुपये देणार, असे आश्वासन महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) दिले होते. त्यामुळे महिलांच्या मतदानाचा फायदा महाविकास आघाडीला होईल, असा विश्वास नेत्यांना आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळेल, असा निष्कर्ष जवळसाप सर्वच एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला होता. (Maharashtra Election Assembly 2024 news)

सकाळच्या टप्प्यात चित्रही तसेच दिसत होते. काँग्रेसने मोठी आघाडी घेतली होती. मतमोजणी पुढे सरकेल तसे चित्र बदलत गेले. काँग्रेस मागे पडली आणि भाजपने निर्णायक आघाडी घेतली. गेल्या काही निवडणुकांमध्ये एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरलेले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातही महाविकास आघाडीला बहुमत मिळेल, असा विश्वास महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT