Mahim Assembly Constituency: राज ठाकरेंची 'ती' दोन वाक्यं शिंदेंना खटकली अन् अमित ठाकरेंसाठीचा 'माहीम'चा तह फिस्कटला ?

Amit Thackeray Vs Sada Sarvankar: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ती दोन वाक्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चांगलीच जिव्हारी लागल्यामुळे त्यांनी शेवटच्या टप्प्यांत अंग काढून घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Eknath Shinde Raj Thackeray sada sarvankar amit thackeray .jpg
Eknath Shinde, Raj Thackeray,sada sarvankar, amit thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता मनसे नेते आणि राज ठाकरेंचं सुपुत्र अमित ठाकरेही निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे हे निवडणूक लढवत आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून सदा सरवणकर उमेदवार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अमित ठाकरेंविरोधात महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे.

मात्र, या माहीम मतदारसंघात महाराष्ट्रातली सर्वात 'हायव्होल्टेज' लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला अमित ठाकरेंसाठी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही (Eknath Shinde) सकारात्मक असतानाच मध्येच अचानक माशी शिंकली अन् मनसेच्या उमेदवाराची माहिमसाठीची वाट खडतर झाली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (Raj Thackeray) ती दोन वाक्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चांगलीच जिव्हारी लागल्यामुळे त्यांनी शेवटच्या टप्प्यांत अंग काढून घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी भाजपसह महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करतानाच त्यांच्या प्रचारासाठी सभाही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतल्या होत्या. त्याचमुळे भाजपने माहिममधून उमेदवारी जाहीर झालेल्या राज ठाकरेंसाठी फिल्डिंग लावली होती.तसेच शिंदेंच्या शिवसेनेवरही पाठिंब्यासाठी दबावंतत्र वापरलं होतं.

Eknath Shinde Raj Thackeray sada sarvankar amit thackeray .jpg
Parliament Winter Session: मोठी अपडेट! संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली, मोदी सरकार 'हे' तीन विधेयक मंजूर करणार ?

उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या, मात्र शिवसेना उमेदवार सदा सरवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला. त्यामुळे माहिममध्ये अमित ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महेश सावंत आणि शिवसेना शिंदे पक्षाचे सदा सरवणकर यांच्यात कडवी लढत होणार आहे. सरवणकरांचा बालेकिल्ला समजला जाणारा माहिम मतदारसंघ मनसेसाठी नक्कीच सोपा नसणार आहे.

शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी महायुतीतील मोठा पक्ष असलेल्या भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही पूर्ण ताकद पणाला लावली होती.पण अचानक शिंदेंनी आपलं अंग काढून घेत निर्णय सरवणकरांवर सोपवला.पण यामागे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची ती दोन वाक्यं जी शिंदेंना खटकल्याचे बोलले जात आहे.

Eknath Shinde Raj Thackeray sada sarvankar amit thackeray .jpg
Babanrao Shinde : बबनदादांनी सुरू केली मुलाच्या विजयाची गोळाबेरीज; पंढरपुरात घेतली भाजपच्या माजी आमदारांची भेट

राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत येईल आणि पण मुख्यमंत्री हा भाजपचा असेल', असा दावा केला होता. जो मुख्यमंत्री शिंदेंना अजिबातच रुचला नसल्याचे सांगितले जात आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे,लोकसभा निवडणुकीवेळी शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेच्या उमेदवारांना धनुष्यबाण चिन्हावर लढण्यावर देण्यात आलेल्या ऑफरवर राज ठाकरेंनी मोठा खुलासा केला होता. त्यावेळी त्यांनी, एकनाथ शिंदेंना खोचक टोला लगावला होता.

राज ठाकरे म्हणाले होते,अहो, आमच्या मनसे पक्षाची निशाणी कमावलेली आहे, ती ढापलेली नाही. निवडणुकीच्या इतक्या वर्षांच्या प्रवासात आमची निशाणी ही मिळाली आहे. लोकांच्या मतदानामुळे ही निशाणी आम्हाला मिळाली, ती कोर्टातून आलेली नाही, असा टोला राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला होता. हाच राज ठाकरेंचा घाव सीएम एकनाथ शिंदेंच्या जास्त वर्मी लागल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com