महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या अशोक खरात प्रकरण आता चित्रपटाच्या माध्यामातून पडद्यावर दिसणार आहे. 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा झाल्यापासून त्यातील कलाकार आणि त्यांच्या भूमिकांबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. विशेपतः वादग्रस्त अशोक खरातची व्यक्तीरेखा कोण साकारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून, ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी हे अशोक खरातची भूमिका साकारणार असल्याचे निर्मात्यांनी जाहीर केले आहे.
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' या चित्रपटातील सर्वाधिक चर्चेत असलेली अशोक खरातची भूमिका अभिनेता मनोज जोशी साकारणार आहेत. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या मनोज जोशी यांनी आजवर विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. विनोदी भूमिकांपासून गंभीर आणि आव्हानात्मक पात्रांपर्यंत त्यांनी अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या चित्रपटातील त्यांचा लूक आणि देहबोली सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ट्रेलरमधील त्यांच्या व्यक्तिरेखेची झलक पाहून अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे अशोक खरातच्या भूमिकेत मनोज जोशी कसा अभिनय करतात, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद आणि अभिनेता सुबोध भावे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ निर्माण झाली होती. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत. तपासादरम्यान राजकीय व्यक्तींशी संबंधित काही छायाचित्रेही समोर आली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.
दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेला 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' हा चित्रपट 20 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे अशोक खरात प्रकरणातील घटनांचे चित्रपटात कशा पद्धतीने चित्रण केले जाणार, याची उत्सुकता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.