Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा सर्जिकल स्ट्राइक! 5 FDA अधिकारी सस्पेंड, 21 जणांवर टांगती तलवार; प्रशासनात प्रचंड खळबळ

Tukaram Mundhe FDA action against officers : तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागातील 5 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. तर 21 अधिकाऱ्यांवरही कारवाईची शक्यता असून प्रशासनात खळबळ उडाली आहे.
Tukaram Mundhe alcohol complaint
Tukaram Mundhe alcohol complaintSarkarnama
Published on: 
Updated on: 

महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागात (FDA) मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. विभागातील 5 अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले असून, आणखी 21 अधिकाऱ्यांची विभागीय स्तरावर चौकशी केली जाणार आहे. या कारवाईमुळे अन्न व औषध प्रशासन विभागात एकच खळबळ उडाली आहे. प्रशासकीय कामकाजातील अनियमितता आणि अधिकाऱ्यांच्या जबाबदारीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे

अन्न व औषध प्रशासनातील या कारवाईकडे सध्या विशेष लक्ष दिले जात आहे. तुकाराम मुंढे यांच्या भूमिकेमुळे ही कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे. 5 अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, तर अन्य 21 अधिकाऱ्यांना विभागीय चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Tukaram Mundhe alcohol complaint
Imtiaz Jaleel Threat Letter : एमआयएमच्या इम्तियाज जलील यांना थेट जीवे मारण्याची धमकी; 'तुमची सुपारी दिलीय', पत्राने राजकारणात खळबळ!

विशेष म्हणजे, हे प्रकरण अलीकडेच समोर आलेले नसून जुने असल्याची माहिती आहे. या कारवाईसंदर्भातील प्रस्ताव जुलै महिन्यातच पाठवण्यात आला होता. त्यानंतर आता निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रस्ताव पाठवण्यापासून प्रत्यक्ष कारवाई होण्यापर्यंतच्या प्रशासकीय प्रक्रियेचीही चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.