FMGE Certificate Scam Sarkarnama
महाराष्ट्र

FMGE Exam Scam : डॉक्टर होण्यासाठी बनावटगिरीचा शॉर्टकट! FMGE प्रमाणपत्र घोटाळ्यात 13 विद्यार्थ्यांना अटक; 22 विद्यार्थ्यांची नावे तपासात उघड

FMGE Certificate Scam : महाराष्ट्रात FMGE परीक्षा घोटाळ्याचा पर्दाफाश झाला असून 15 ते 20 लाखांत विकली बनावट प्रमाणपत्रे विकल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात 22 विद्यार्थ्यांची नावे तपासात उघड झाली आहेत. तर 13 विद्यार्थ्यांना अटक झाली आहे.

सरकारनामा ब्युरो

Maharashtra News : परदेशात MBBS चे शिक्षण घेतल्यानंतर FMGE परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांना बनावट उत्तीर्ण प्रमाणपत्रे विकणाऱ्या आंतरराज्य टोळीचा महाराष्ट्र सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

या प्रकरणात आतापर्यंत एकूण २२ वैद्यकीय विद्यार्थ्यांना बनावट प्रमाणपत्रे देण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. त्यापैकी १३ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच परीक्षा प्रमाणपत्रांशी संबंधित वेबसाइट हॅक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीतील तीन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याकडून १५ ते २० लाख रुपये घेऊन बनावट उत्तीर्ण प्रमाणपत्रे दिली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात वैद्यकीय अधिकारी किंवा अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली आहे.

दरम्यान, परदेशातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना भारतात डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करण्यासाठी NBEMS मार्फत घेतली जाणारी FMGE परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय व्यवसाय करता येत नाही.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे (MMC) नोंदणीसाठी आलेल्या अर्जांची छाननी करताना काही उमेदवारांनी बनावट गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने महाराष्ट्र सायबरकडे याबाबत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आणि या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT