Fake Disability Certificate : तुकाराम मुंढेंच्या मोहिमेचा आणखी एक परिणाम; बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात शिक्षकाला अटक

Teacher arrested in Maharashtra fake disability certificate scam : दिव्यांग प्रमाणपत्रासाठी बनावट आधारकार्ड मिळवून दिल्याचा आरोप; सोलापूर पोलिसांची कारवाई, त्रिसदस्यीय समितीच्या चौकशीत धक्कादायक बाबी समोर.
Fake Disability Certificate
Fake Disability CertificateSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar News : दिव्यांग कल्याण विभागाचा कार्यभार संभाळत असताना, तुकाराम मुंढे यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तापसणीचा आदेश दिला होता. तुकाराम मुंढे यांची या विभागातून अन्न व औषध प्रशासनात बदली झाली आहे.

तरी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीची मोहिम सुरूच आहे. यातच सोलापूर पोलिसांनी अहिल्यानगरच्या पाथर्डी येथील शिक्षक विजय गर्जे याला बनावट दिव्यांग प्रमाणपत्रासाठी बनावट आधारकार्ड मिळवून देण्यासाठी मदत केल्याप्रकरणी अटक केली आहे.

विजय गर्जे हा बीड (BEED) जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. जिल्ह्याच्या पाटबंधारे विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेला राजेश जाधव याने दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बनावट आधारकार्ड काढले होते. यासाठी विजय गर्जे याने मदत केल्याचा आरोप आहे.

राजेश जाधव याने गेल्यावर्षी अहिल्यानगर (Ahilyanagar) येथील जिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. मात्र शारीरिक तपासणीत जाधव अपात्र ठरल्याने त्याला दिव्यांग प्रमाणपत्र मिळू शकले नाही. त्यानंतर जाधव याने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवले.

Fake Disability Certificate
Ashok Gaikwad passes away : आरक्षण उपवर्गीकरणाच्या आंदोलनाची रणनीती सांगताना ज्येष्ठ आंबेडकरी नेते अशोक गायकवाड कोसळले; 'जय भीम' म्हणत घेतला अखेरचा श्वास

राजेश जाधव याने हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बनावट आधारकार्ड बनवून घेतले होते. त्यासाठी शिक्षक विजय गर्जे याने मदत केल्याचा संशय आहे. दिव्यांग संघटनेने या विषयवार तक्रार केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती.

Fake Disability Certificate
Amol Khatal Vs Balasaheb Thorat : 'भावी मुख्यमंत्र्याचा पराभव करून आलो'; आमदार अमोल खताळांचा बाळासाहेब थोरातांना अप्रत्यक्ष टोला

समितीच्या चौकशीत जाधव अन् गर्जेंवर ठपका

या समितीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर त्यात राजेश जाधव हा दोषी आढळून आला, तर त्याला विजय गर्जे याच्यासह आणखी चार आरोपींनी मदत केल्याचे तपासात आढळून आले. पोलिसांनी आतापर्यंत गर्जे याच्यासह चार जणांना अटक केली आहे. विजय गर्जे हा न्यायालयीन कोठडीत होता.

मुंढेंच्या बदलीनंतर मोहीम रेंगाळली

राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागात तुकाराम मुंढे सचिव म्हणून कार्यरत असताना, त्यांनी सर्व 34 जिल्हा परिषदांना लेखी आदेश देत दिव्यांग प्रमाणपत्रांची व्यापक पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. राज्यातील दिव्यांग योजनांचा लाभ बोगसगिरीने घेणाऱ्यांविरुद्ध कठोर मोहीम उघडण्यात आली आणि त्यात अनेक बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवणारे अनेक जण आढळून आले. आजही यात काही दडून बसले आहे. पण तुकाराम मुंढे यांची आता अन्न व औषध प्रशासनात बदली झाल्याने ही मोहीम आता थंड पडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com