Fake Disability Certificate : जिल्हा परिषदेतील 46 शिक्षक अन् कर्मचाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड, आणखी ३५० शिक्षक रडारवर

Pune ZP Takes Action Against 46 Teachers After Disability Certificate Review : बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा खेळ मांडणाऱ्या शिक्षकांना पाच शिक्षकांचा पर्दा फार्श झाला असून त्यांच्याविरोधात विभागीय चौकशीचा फास आवळला गेला आहे.
Teacher
Teacher Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : शासकीय सवलती आणि विशेष भत्त्यांची मलिदा लाटण्यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा खेळ मांडणाऱ्या शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना पुणे जिल्हा परिषदेने चांगलाच दणका दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर करण्यात आलेल्या सखोल वैद्यकीय पुनर्तपासणीत तब्बल ४६ शिक्षक आणि कर्मचारी अपात्र आढळले आहेत.

या प्रकरणात आता ५ कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशीचा फास आवळला गेला असून, ४१ जणांना मिळालेले भत्ते आणि सवलती रद्द करून ती रक्कम वसूल करण्याचे थेट आदेश देण्यात आले आहेत.

दिव्यांगांच्या हक्कांवर दरोडा टाकणाऱ्या या प्रकाराबाबत विविध दिव्यांग संघटनांनी आक्रमक भूमिका घेत, चौकशीची मागणी लावून धरली होती. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने संशयित शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना पुण्याचे ससून रुग्णालय, मुंबईचे जे. जे. रुग्णालय तसेच आरोग्य उपसंचालकांकडे वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले होते. या फेरतपासणीचा अहवाल येताच बोगसगिरीचे पितळ उघडे पडले असून, ४६ जण अपात्र ठरले आहेत.

Teacher
Disability Certificate Scam: बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर सरकारी नोकरी! सोलापूर शासकीय रुग्णालयातील 2 लिपिकांसह 6 जण अटकेत

टक्केवारीनुसार कारवाईची वर्गवारी

उच्च न्यायालयाच्या नियमानुसार या अपात्र कर्मचाऱ्यांवर टप्प्याटप्प्याने कारवाई केली जात आहे. ० ते १० टक्के दिव्यांगत्व असलेल्या ५ कर्मचाऱ्यांवर थेट विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. तर १० ते ४० टक्के दिव्यांगत्व या श्रेणीत येणाऱ्या ४१ कर्मचाऱ्यांना दिव्यांगत्वाच्या आधारे मिळालेले सर्व विशेष भत्ते आणि सवलती रद्द करण्यात आल्या असून, आतापर्यंत लाटलेल्या रकमेची वसुली करण्याची कारवाई सुरू आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, यातील कोणत्याही कर्मचाऱ्याने नोकरी मिळवताना दिव्यांग कोट्याचा वापर केलेला नव्हता; तर सेवेत आल्यानंतर बदल्या टाळण्यासाठी किंवा विशेष भत्ते उकळण्यासाठी ही बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे सादर केली होती.

Teacher
Fake Disability Certificate : तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या पडताळणी मोहिमेत नवा खुलासा; बनावट दिव्यांग प्रमाणपत्रासाठी शिक्षकाची मदत?

आणखी ३५० शिक्षक रडारवर!

या प्रकरणाची व्याप्ती एवढ्यावरच थांबणारी नसून, ती आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. सध्या आणखी सुमारे ३५० शिक्षकांची ससून रुग्णालयात वैद्यकीय पुनर्तपासणी सुरू आहे. दर आठवड्याला ३० ते ३५ शिक्षकांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. या तपासण्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर, त्यातही जे शिक्षक अपात्र आढळतील, त्यांच्यावर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com