Ladki Bahin Yojana Sarkarnama
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : नियमबाह्य लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचारी अन् त्या पुरुषांची खैर नाही; जिल्हाधिकाऱ्यांना पैसे वसुलीचे आदेश

Aditi Tatkare Orders On Ladki Bahin Yojana Scam : 'लाडकी बहीण योजनेत' मोठा घोटाळा झाल्याची धक्कादायक कबुली सरकारने पावसाळी अधिवेशनातच दिली आहे.

Aslam Shanedivan

Maharashtra Ladki Bahin Yojana Scam controversy News : राज्या सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'त मोठ्या प्रमाणावर गैर व्यवहार झाल्याचे समोर आले असून काही सरकारी कर्मचारी आणि पुरूषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. यानंतर या योजनेला ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली. ज्यानंतर तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या. या सर्वांना मिळणारे 1500 रुपयांची मदत थांबवण्यात आली.

यामुळे विरोधकांनी सरकारला घेरलं असतानाच विधीमंडळाच्या पावसळी अधिवेशनात सरकारने या योजनेत मोठा घोटाळा झाल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. तर या नियमबाह्य लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचारी अन् त्या पुरुषांकडून पैसे वसूल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत सुमारे 1.57 कोटी ते 1.75 कोटी महिला पात्र ठरल्या आहेत. तर ई-केवायसी (e-KYC) पडताळणी प्रक्रियेनंतर ई-केवायसी न करणे, आयकर भरणे आणि वयोमर्यादा ओलांडणे या कारणांमुळे सुमारे 72 ते 80 लाख महिलांना योजनेतून अपात्र ठरवण्यात आले. आता या सर्वांचे लाभ सरकारने रोखले आहेत.

दरम्यान याच योजनेचा लाभ सुमारे (14,298) पुरुषांनी घेतला असून योजनेतून तब्बल 21 कोटी रुपये लाटल्याचे समोर आले होते. तसेच याच योजनेत तब्बल 13,415 शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य आणि बेकायदेशीरपणे लाभ घेतल्याचे देखील उघड झाले होते. या सर्वाची माहिती देताना या योजनेत घोटाळाची कबूली सरकारने दिली आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित झालेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे. तर ही माहिती त्यांनी लेखी स्वरूपात सादर केली आहे. या माहितीनुसार, योजनेचे नियम धाब्यावर बसवून अपात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या तिजोरीतून तब्बल 165 कोटी रुपयांचा लाभ लाटला आहे.

यानंतर आता या पैशांची वसूली होणार का असा प्रश्न अनेकांना पडला असतानाच या सर्व अपात्र लाभार्थ्याकडून पैसे वसुलीचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याचे तटकरे यांनी सांगितले आहे. तसेच जेव्हा या योजनेतील घोटाळा समोर आला त्याचवेळी सरकारने तात्काळ पावले उचलत कडक कारवाई सुरू केल्याचे म्हटलं आहे.

अपात्र लाभार्थ्यांचे हप्ते तात्काळ बंद करण्यात आले असून आता नियमबाह्यपणे बँक खात्यात जमा झालेली रक्कम वसूल केली जाणार आहे. यासाठी संबंधित शासकीय विभाग आणि सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश देण्यात आल्याचेही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT