Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींवर शासनाचा सर्जिकल स्ट्राइक, अमरावतीत 33 हजार महिला कायमच्या अपात्र; कारणही आले समोर

Amravati 33,000 Ladki Bahin ineligible : अमरावती जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेतून तब्बल 33 हजारांहून जास्त महिलांना कायमस्वरुपी अपात्र ठरवण्यात आले आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSarkarnama
Published on
Updated on

Amravati News : राज्यात पुन्हा सत्तेत आलेल्या महायुती सरकारने महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी 'लाडकी बहीण योजना' सुरु केली. या योजनेतून लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. पण आता काही अटी व शर्ती घालण्यात आल्या असून त्यांची पुर्तता केल्यानंतरच या योजनेचा लाभ राज्यातील लाडक्या बहिणींना मिळत राहणार आहे. दरम्यान या योजनेत चुकीच्या पद्धतीने काहींनी लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान आता अमरावती जिल्ह्यातल्या शासनाने तब्बल 33 हजार लाडक्या बहिणींवर सर्जिकल स्ट्राइक केल्याचे समोर आले असून या महिलांना कायमचे अपात्र ठरवण्यात आले आहे. यामुळे या महिलांना आता या योजनेचा लाभ आता घेता येणार नाही. तर यामागचे कारण देखील समोर आहे आहे.

राज्य सरकारने महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी 'लाडकी बहीण योजना' सुरु करत दरमहा 1500 रुपये लाभ महिलांना दिला होता. पण काही ठिकाणी लाभार्थ्यांची कागदपत्रे, उत्पन्नाची माहिती आणि इतर निकषांची सखोल तपासणीत चक्क काही पुरुषांनी महिलांच्या नावाने या योजनेतून लाभ घेतल्याचे समोर आले.

Ladki Bahin Yojana
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana : 'एकाही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही!' हप्ते थांबल्यानंतर अदिती तटकरेंचे मोठे विधान; समोर आली 4 मोठी कारणं

तर काही ठिकाणी सरकारी कर्मचारी महिलांसह पुरुषांनी या योजनेतून पैसे लाटल्याचे उघड झाले. यानंतर प्रशासनाने ई-केवायसी मोहिम राबवत या योजनेत सूत्रता आणण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने गेले 8-10 महिने ई-केवायसी मोहिम राबवली. ज्यात लाखो महिला अपात्र ठरल्या.

दरम्यान अमरावती जिह्यात धक्कादायक माहिती समोर आली असून जिल्ह्यातल्या तब्बल 33 हजार 304 महिला लाभार्थी या योजनेतून कायमच्या अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची कागदपत्रे, उत्पन्नाची माहिती आणि इतर निकषांची सखोल तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये अनेक अर्जदारांनी चुकीची माहिती दिल्याचं स्पष्ट झालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या सर्व लाभार्थ्यांकडून गेले 15-20 महिन्यांपासून सरकारची लूट केली जात होती.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : 'गरज सरो अन् वैद्य मरो!' योजनेचा 81 लाख महिलांचा लाभ बंद, जयंत पाटील सरकारच्या कारनाम्यावर आक्रमक

आता शासनाची दिशाभूल करने या लाभार्थ्यांना चांगलेच महागात पडणार असून सर्व बोगस लाभार्थ्यांकडून सरकारने लाभाची रक्कम वसूल करण्याचीही मोहिम हाती घेतली आहे. यामुळे अशा बोगस लाडक्या बहि‍णींचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. आतापर्यंत एकूण 80 लाख अपात्र लाभार्थ्यांना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com