Maharashtra Government : अखेर महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी आणि महापूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली आहे. मंगळवारी (7 ऑक्टोबर) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांसाठी तब्बल 31 हजार 628 कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. यानंतरही अजून मदत लागली तरी देणार, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे, पिकांचे, घरांचे, गोठ्यांचे नुकसान झाले. दुर्दवाने काही लोक मृत्यूमुखी पडले, जनावरे दगावली, असे प्रचंड भीषण दृष्य बघायला मिळाले. आम्ही देखील बांधावर जाऊन ही स्थिती बघितली, शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. यानंतर आपण काही ठिकाणी तातडीची मदत म्हणून 10 हजार रुपयांची मदतही केली. आता मदतीचे एक कॉम्पेहेन्सिव्ह पॅकेज तयार केले आहे.
महाराष्ट्रामध्ये 1 कोटी 43 लाख 52 हजार 281 हेक्टर जमिनीवर पिकांची लागवड झाली होती. यापैकी 68 लाख 69 हजार 756 हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. यात काही जमिनीवर अंशतः तर काही ठिकाणी पूर्णतः नुकसान झाले आहे. 29 जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. 253 तालुक्यांमध्ये सरसकट मदत करत आहोत. यात 2059 मंडळांमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे 65 मिलिमीटरची अट ठेवलेली नाही. जिथे गरज आहे तिथे मदतीचा निर्णय घेतला आहे.
मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख प्रत्येकी देणार.
जखमी व्यक्तींना 74,000 रुपये ते 2.5 लाख देणार.
घरगुती भांडे, वस्तूंचे नुकसानीसाठी 5 हजार प्रतिकुटुंब देणार.
कपडे, वस्तूंचे नुकसानीसाठी 5 हजार प्रतिकुटुंब देणार.
दुकानदार, टपरीधारकांना नुकसानीसाठी 50 हजार रुपये देणार.
पडझड, नष्ट पक्क्या घरांसाठी 1 लाख 20 हजार रुपये देणार. (प्रधानमंत्री आवास योजना)
डोंगरी भागात पडझड, नष्ट कच्च्या घरांसाठी 1 लाख 30 हजार रुपये देणार. (प्रधानमंत्री आवास योजना)
अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी 6 हजार 500 रुपये देणार.
पडझड झालेल्या झोपड्यांसाठी 8 हजार 000 रुपये देणार.
पडझड झालेल्या जनावरांच्या गोठ्यांसाठी 3 हजार 000 रुपये देणार.
दुधाळ जनावरांसाठी 37 हजार 500 रुपयांची मदत करणार.
NDRF मधील 3 जनांवरांची मर्यादा काढून टाकली. प्रत्येक जनावरांसाठी मदत देणार.
ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी 32 हजार रुपये प्रति देणार.
कुक्कुटपालनात प्रति कोंबडी 100 रुपये मदत देणार.
खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी साडे तीन लाख रुपये मदत देणार. यात 47 हजार रुपये कॅश आणि 3 लाख रुपये नरेगाच्या माध्यमातून देणार.
गाळाने बुजलेल्या विहिरींसाठी 30 हजार रुपये मदत देणार.
एनडीआरएफ निकषांप्रमाणे प्रति हेक्टर आणि राज्य सरकारकडून अधिकची मदत मिळणार.
कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर 8 हजार 500 रुपये + बियाणे आणि खतांसाठी प्रति हेक्टरी 10 हजार अतिरिक्त मदत
हंगामी बागायतदार शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर 17 हजार रुपये + बियाणे आणि खतांसाठी प्रति हेक्टरी 10 हजार अतिरिक्त मदत
बागायती शेतकऱ्याला प्रति हेक्टर 22 हजार 500 + बियाणे आणि खतांसाठी प्रति हेक्टरी 10 हजार अतिरिक्त मदत
ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठी 10 हजार कोटी रुपये देणार.
जिल्हा नियोजन निधीतून 5 टक्के म्हणजे 1500 कोटी रुपये पूरग्रस्त भागातील कामांसाठी देणार.
दुष्काळ निकषांप्रमाणे शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यींची संपूर्ण फी माफी करणार.
जमीन महसूलात सूट, कर्जांचे पुनर्गठण, शेतीशी निगडीत कर्जवसुलीसाठी स्थगिती देणार.
रोजगार हमी योजनेच्या कामाच्या निकषात बदल करणार.
45 लाख शेतकऱ्यांनी आतापर्यंत विमा उतरवला आहे.
यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना 35 हजार रुपये तर बागायतदार शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रति हेक्टरी पैसे मिळतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.