Shivbhojan Thali 
महाराष्ट्र

Shiv Bhojan Thali: ठाकरेंनी आणलेली 'शिवभोजन थाळी' फडणवीसांना आवडेना? केंद्र चालक आक्रमक, पोलिसांशी धक्काबुक्की

Shiv Bhojan Thali: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अर्थात महाविकास आघाडी सरकारनं आणलेल्या आणि कोरोना काळात बेघर लोकांपासून अनेकांची पोटं भरलेल्या १० रुपयात शिवभोजन थाळी योजनेला आता घरघर लागली आहे.

Amit Ujagare

Shiv Bhojan Thali: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अर्थात महाविकास आघाडी सरकारनं आणलेल्या आणि कोरोना काळात बेघर लोकांपासून अनेकांची पोटं भरलेल्या १० रुपयात शिवभोजन थाळी योजनेला आता घरघर लागली असून त्याला कोणी वालीच उरलेला नाही. कारण महाराष्ट्र सरकारनंच या योजनेचे पैसे थकवले असून याविरोधात या योजनेच्या संचालकांनाच रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. नागपूरमध्ये अनेक केंद्र संचालकांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना घेराव घातला तसंच फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात.

केवळ १० रुपयात पोटभर जेवण ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत योजना असलेल्या 'शिवभोजन थाळी' योजनेचं अनुदान गेल्या वर्षभरापासून थकलेला आहे. थकीत अनुदानामुळं नागपुरात शिवभोजन थाळी केंद्राचे संचालकांनी बावनकुळे यांना घेराव घालत सरकार विरोधात मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल होताच शिवभोजन संचालक संतप्त घोषणाबाजी केली, यामध्ये महिला केंद्र संचालकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. यावेळी बावनकुळे आंदोलकांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी पुढे आले असतानाही जोरदार घोषणाबाजी सुरु होती. याचवेळी एक संचालक पोलीस कर्मचाऱ्यांसोबत भिडला, पोलिसांशी वादावादी झाल्यानं या संचालकाना पोलिसांनी धक्कादेत बाजुला नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं काहीकाळ इथं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

दरम्यान, या विषयवार बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शिवभोजन थाळी चालक मला भेटायला आले होते. मागच्या कॅबिनेटच्या बैठकीत मी मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली होती. आताही मी चर्चा करतो आहे. त्यांचे दहा महिन्याचे पैसे प्रलंबित आहेत. काही ठिकाणी चार महिन्यांपासून काही ठिकाणी सहा महिन्यापांसून त्यांचं अनुदान थकलेलं आहे. आजच मी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करणार आहे, यांना लवकरात लवकर पैसे कसे मिळतील यासाठी माझा प्रयत्न असेल.

विभागीय आयुक्त कार्यालयात आलो असता यांच्या संतप्त भावना मला या ठिकाणी दिसल्या. यातील अनेक लोकांनी कर्ज काढून ही योजना चालवली आहे. त्यामुळं लवकरात लवकर त्यांच्या कामाचे पैसे मिळाले पाहिजे यासाठी मी प्रयत्न करतो आहे. मागच्या वेळी अनेक बहिणी आल्या होत्या, मात्र आता छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून तोडगा काढणार आहोत, त्यांच्या भावना संतप्त आहेत. मी सगळ्यांचं ऐकत असताना काही लोकांनी जास्त आक्रोश केला. मी ऐकतो आहे, चर्चा करतो आहे. त्यावर एवढा मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा पवित्रा घेणे योग्य नव्हतं. मात्र, मी पोलिसांना सांगितला आहे की त्यांच्यावर कुठली कारवाई करू नका, पण त्यांच्या शिवभजन थाळीचे पैसे नक्कीच मिळतील, असंही बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT