Ganesh Naik: "असं मंत्रीपद काय चाटायचंय का?" गणेश नाईकांचा पुन्हा एकनाथ शिंदेंवर थेट प्रहार; म्हणाले, मला लाज वाटते...

Ganesh Naik: मंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं असून त्यांच्या नगरविकास खात्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत.
Ganesh Naik Targets Eknath Shinde
Ganesh Naik Targets Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Ganesh Naik Janata Darbar: नवी मुंबईतील विकास कामांवरुन वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक हे चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. गुरुवारी वाशी इथं पार पडलेल्या जनता दरबारात त्यांनी अनेक मुद्द्यांवरुन अधिकाऱ्यांची आणि मंत्र्यांची पिसं काढली. महापालिकेवर प्रशासक असतानाच्या काळात अनेक घोटाळे केले गेले आहेत. या घोटाळ्यांत दोषी असणाऱ्यांवर फोजदारी गुन्हे दाखल करण्यास मी स्वतः सांगणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचताना असं मंत्रीपद काय चाटायचंय का? अशा शब्दांत नाईक यांनी जोरदार प्रहार केला आहे.

Ganesh Naik Targets Eknath Shinde
Sougata Roy Video : मोदीही दादा म्हणतात, त्या 78 वर्षीय नेत्याचा तरूण महिला खासदारासोबतचा लोकसभेतील व्हिडीओ होतोय व्हायरल...

नवी मुंबईतील नागरी सुविधांवरुन भाजपचे नेते गणेश नाईक पुन्हा एकदा संतापलेले पाहायला मिळाले. जनता मेळाव्यात बोलताना गणेश नाईक म्हणाले, हॉस्पिटलकरिता, बागेकरिता, एखाद्या शाळेकरिता सुद्धा भुखंड दिले गेले नाहीत ते बिल्डरचांच्या घशात यांच्या दलालांनी घातले. मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रीमंडळात मी आहे त्या मंत्रीमंडळाच्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला, अशा शब्दांत त्यांनी एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं आणि सडकून टीकाही केली.

Ganesh Naik Targets Eknath Shinde
Narhari Zirwal ACB raid : झिरवळांविरोधात 'डर्टी पॉलिटिक्स'? यशोमती ठाकुरांचा स्फोटक दावा; भाजपला थेट फटका

ते पुढे म्हणाले की, गेल्या सहा वर्षात लोकनियुक्त सत्ता नसताना प्रशासक कारभार पाहत असताना अधिकाऱ्यांच्याकरवी अनेक निर्णय घेण्यात आले. इथं विविध विकासामांना दिलेल्या मान्यता, वाढीव खर्च, कंत्राटं आणि निधी वाटप याबाबत पारदर्शकता नसल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. विविध प्रकल्पांना मान्यता, वाढीव खर्च, कंत्राटं आणि त्यासाठीचा निधी वाटप याबाबत पारदर्शकता पाळली नसल्याचं गणेश नाईक यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या मुळं काही माजी नगरसेवकांची काम मार्गी लावली गेली असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com