Comscore Ranking 2026 : डिजिटल माध्यमात 'ई-सकाळ'चा डंका! दिग्गज न्यूज प्लॅटफॉर्म्सना मागे टाकत पटकावले अव्वल स्थान

Comscore ranking Sakal Comscore Ranking 2026 अहवालानुसार ई-सकाळ भारतातील क्रमांक 1 मराठी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म ठरला आहे. डिजिटल वाचकसंख्या आणि प्रभावात मोठी झेप घेत ई-सकाळने अव्वल स्थान मिळवले आहे.
Comscore ranking
Comscore rankingSarkarnama
Published on
Updated on

डिजिटल विश्वात ई-सकाळने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सकाळ मिडिया ग्रुपच्या डिजिटल शाखेने आघाडी घेत प्रमुख न्यूज प्लॅटफॉर्म्सना मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. Comscoreच्या जानेवारी 2026 च्या अहवालानुसार esakal.com हा सर्वाधिक वाचला जाणारा मराठी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म ठरला आहे. तब्बल 13.05 million मासिक active users मिळवत ई-सकाळने डिजिटल पत्रकारितेत नवा विक्रम नोंदवला आहे.

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वाचकांचा विश्वास जिंकणे मोठे आव्हान आहे. मात्र, ई-सकाळने पारंपरिक पत्रकारितेची भक्कम पायाभरणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत विश्वासार्हतेचा नवा पैलू घालून दिला आहे. अचूक आणि वेगवान आणि निष्पक्ष या तीन घटकांवर भर देत सकाळ या डिजीटल प्लॅटफॉर्मने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Comscore ranking
Congress Leader : धक्कादायक! राज्याचे माजी मंत्री वादाच्या भोवऱ्यात; काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झाल्याने खळबळ

या यशामागे महत्त्वाचा घटक म्हणजे विश्वासार्ह वार्तांकन. तसेच तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर बदलता ट्रेंड, ताज्या घडामोडी, राजकारण, देश-विदेशमधील घटना, लाइफस्टाईल, तंत्रज्ञान, मनोरंजन अशा अनेक विषयांच्या घडामोडी वाचकांना वाचायला मिळतात. तसेच अफवा आणि अप्रमाणित बातम्यांच्या गर्दीत ई-सकाळने काटेकोर fact-checking आणि निष्पक्ष दृष्टीकोन कायम ठेवला.

तसेच स्थानिक घडामोडींवर असलेला विशेष भर. आणि मुंबई, पुणे तसेच ग्रामीण भागातील बातम्या तितक्याच प्रभावीपणे मांडल्या जातात. तिसरे म्हणजे सादरीकरणातील नाविन्य असतेच त्यामुळे व्हिडिओ, स्वरूपामुळे तरुण वाचक मोठ्या प्रमाणावर जोडले गेले आहेत.

Comscore ranking
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मोठा झटका! 30 लाख शेतकरी 22 व्या हप्त्याला मुकणार? पाहा काय आहे कारण, या यादीत तुमचे नाव तर नाही ना?

ई-सकाळसाठी हे यश केवळ आकड्यांचा विक्रम नाही, तर महाराष्ट्रातील वाचकांनी दाखवलेल्या विश्वासाची पावती आहे. डिजिटल माध्यमात विश्वास, वेग आणि गुणवत्ता या त्रिसूत्रीच्या बळावर ई-सकाळने आपली वेगळी ओळख निर्माण केली असून आगामी काळातही ही आघाडी कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com