Existing Sarpanchs of 14,000 Gram Panchayats will now continue as Administrators Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Government : मुदत संपलेल्या 14 हजार ग्रामंपचायतींवर विद्यमान सरपंचांची प्रशासक म्हणून नेमणूक : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Government : राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ग्रामविकास विभागाचे अवर सचिव बाबुराव आसोले यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Rahul Gadkar

Maharashtra Government : महाराष्ट्र सरकारने मुदत संपलेल्या 14 हजार ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. ग्रामविकास विभागाचे अवर सचिव बाबुराव म्हादू आसोले त्यांनी याबाबतचे आदेश सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्यातील नगरपालिका नगरपंचायत, महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूक संपल्यानंतर ग्रामपंचायतीचा धुरळा उडणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर या निर्णयामुळे सरपंचांनाच प्रशासक म्हणून नेमणूक मिळणार आहे. तर ग्रामपंचायतीतील सदस्यांना प्रशासकीय समितीत संधी मिळणार आहे.

गावातील सरपंचांना 6 महिने किंवा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्याच ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून राहता येणार आहे. शिवाय पंचायतीचे काम सुरळीत चालण्यासाठी उपसरपंच आणि सदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन करता येणार आहे. प्रशासकीय नियमानुसार सरपंच उपसरपंच आणि समितीचे सदस्यांना कर्तव्याचे पालन करण्यासाठी योग्य सूचना देण्याच्या सल्ला सर्व जिल्हा प्रशासन पातळीवर देण्यात आले आहेत.

सरपंचांकडे राहणार सूत्र

याआधी देखील काही ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे. 28 फेब्रुवारी रोजी राज्यातील अनेक ग्रामपंचायतीची मुदत संपणार आहे. मात्र प्रशासकीय कारणामुळे या निवडणुका घेणे शक्य नसल्याचे सांगत सरकारने हा आदेश काढला आहे. ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळण्यासाठी या सरपंचांना प्रशासक म्हणून नेमण्यात येणार आहे.

राज्यातील 14 हजार ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे किंवा संपत आहे. निवडणूक होणाऱ्या या ग्रामपंचायतीवर 'ग्रामसेवकांना' प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. पण या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तूर्त स्थगिती दिली आहे. यामुळे ग्रामपंचायतींना मोठा दिलासा मिळाला होता. तरी यासंदर्भात लेखी उत्तर देण्यासाठी उच्च न्यायालयाने २४ फेब्रुवारी ही तारीख दिली आहे. पण त्यापूर्वीच हा निर्णय घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT