Nagpur Job Fraud : केंद्रीय मंत्र्याच्या PA सोबत ओळख असल्याची बतावणी; उकळले लाखो रुपये : विदर्भातील बंटी-बबलीला नागपूर पोलिसांच्या बेड्या

Government job scam Nagpur : नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पीएसोबत ओळख असल्याचे सांगून नोकरी व भूखंडाचे आमिष दाखवत 7 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चंद्रपूरच्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
Nagpur Police investigating ₹7 lakh job and land scam case involving Chandrapur couple accused of misusing Nitin Gadkari’s name.
Nagpur Police investigating ₹7 lakh job and land scam case involving Chandrapur couple accused of misusing Nitin Gadkari’s name.Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पीए तसेच आरोग्य मंत्र्यांच्या पीएशी ओळख असल्याचे सांगत शासकीय नोकरी व भूखंड मिळवून देण्याचे आमिष दाखवून 7 लाख 1 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.

चंदू किसन खोब्रागडे (वय 50), सुचिता चंदू खोब्रागडे (वय 45, रा. ब्रह्मपुरी, चंद्रपूर) अशी आरोपींची नाव आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आनंदनगर परिसरात राहणारे युवराज गंगाराम मेश्राम (वय 60) प्रॉपर्टी डिलिंगचे काम करतात. त्यांची दोन्ही मुले बाहेरगावी शिकायला आहेत. चंदू त्यांचा दूरचा भाचा आहे. 17 मार्च 2013 रोजी नात्यातील व्यक्तीच्या अंत्यसंस्कारादरम्यान त्यांची ओळख झाली.

2015 मध्ये ते आणि त्यांचे मित्र पाचपावलीतील कार्यालयात बसले असताना, चंदू तिथे आला. त्याने मंत्रालयात प्रभावी व्यक्तींशी ओळखी असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पीएसोबत ओळख असल्याचे सांगितले. त्यांच्या मार्फत अनेकांना नोकरी लावून दिल्याची बतावणीही केली. यावरून मेश्राम यांनी त्यांच्या मुलाला बारावीनंतर नोकरी लावून देण्याची विनंती केली. चंदूने त्याला आरोग्य विभागात नोकरी मिळवून देण्यासोबतच परिसरातील भूखंड मिळवून देण्याचेही आश्वासन दिले.

Nagpur Police investigating ₹7 lakh job and land scam case involving Chandrapur couple accused of misusing Nitin Gadkari’s name.
HSC Paper Leak: धक्कादायक! बारावीचे दोन पेपर फुटले! परीक्षेच्या तासाभरापूर्वीच प्रश्नपत्रिका व्हाट्सअँपवर व्हायरल

या आमिषाला बळी पडून मेश्राम यांनी एप्रिल 2015 ते ऑगस्ट 2016 दरम्यान रोख आणि धनादेशाद्वारे एकूण 7 लाख 1 हजार रुपये दिले. मात्र, दिलेल्या आश्वासनांनुसार नोकरी किंवा भूखंड मिळवून दिला नाही. पैसे परत मागितल्यावर आरोपी व त्याची पत्नी सुचिता यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून मेश्राम यांनी पाचपावली ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com