Kolhapur News : कोल्हापूर महापालिकेत स्वीकृत नगरसेवकपदी काँग्रेसच्या कोट्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष सुनील मोदी यांची निवड झाली. त्यानंतर शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आला. परिवहन समितीमध्ये आपले नाव असताना अचानक बदलल्याने कोल्हापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख विशाल देवकुळे यांनी सुनील मोदी यांच्या घरासमोर जाऊन जाब विचारत राडा घातला. या घडलेल्या प्रकारापासून कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारीच अलबेल होते.
संबंधित घटनेबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांना माहितीच नव्हते असं समोर आले आहे. पवार यांना संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. तर रविकिरण इंगवले यांनी विशाल देवकुळे यांचा आरोप खोडून काढला आहे. शिवसैनिकांच्या संतापानंतर रविकिरण इंगवले यांनी दिलेली प्रतिक्रिया सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
विशाल देवकुळे यांनी काँग्रेसने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा घात केला असा आरोप केला. त्यावर जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितलं, काँग्रेसकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेवर अन्याय होतो असे म्हणता येणार नाही. विशाल देवकुळे हे कट्टर शिवसैनिक आहेत ते पक्षाचे प्रामाणिकपणे काम करतात.
पण काँग्रेस नेते सतेज पाटील आणि नगरसेवक सुनील मोदी यांचे काय बोलणे झाले हे आपल्याला माहिती नाही. मात्र काँग्रेसने पक्षाला पद दिले शहरप्रमुखाला पद दिले. काँग्रेसने शिवसेनेला चांगली वागणूक दिल्याने त्यांचे आभार मानले पाहिजे. असे विधान करत झालेल्या प्रकार आपल्याला माहीत नसून आपण बाहेरगावी असल्याचे स्पष्टीकरण इंगवले यांनी दिले.
विशाल देवकुळे यांनी सुनील मोदी यांना जाब विचारल्यानंतर देवकुळे सुनील मोदी यांच्यात चर्चा झाली. देवकुळे यांना परिवहन समितीवर सदस्य म्हणून घेण्याचा शब्द देण्यात आला होता तो माघारी का घेतला? असा जाब देवकुळे यांनी विचारला. जर पक्षाने सर्व गोष्टीचा त्याग केला असेल तर पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी का मिळत नाही. मोदी यांनी आपल्या नावाचा आग्रह का केला नाही? असा अनेक प्रश्नांचा भडीमार करत मोदी यांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा द्यावा. अशी मागणी देवकुळे यांनी करत वरिष्ठांशी चर्चा करून तक्रार करणार असल्याची प्रतिक्रिया देवकुळे यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.