Heavy rainfall disrupts daily life in Mumbai and Pune as roads witness waterlogging. The Maharashtra rain alert has put citizens and authorities on high alert. Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert : अखेर वरूणराजा बरसला! मुंबई-पुण्यात तुफान पाऊसाची हजेरी, तर 'या' जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

Mumbai Pune Heavy Rain Update : कालपासून पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. मात्र, मुंबईतील चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली आहे. अशातच ठाणे, रायगड, पालघर आणि सिंधुदुर्गात या जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Jagdish Patil

Maharashtra Monsoon Latest Update: अखेर राज्यभरातील नागरिकांची प्रतिक्षा संपली असून अनेक ठिकाणी पावसानं दमदार हजेरी लावली आहे. मुंबई पुण्यासह सांगली साताऱ्यात काल रात्रीपासूनच पावसाला सुरूवात झाली आहे. तर आज सकाळपासून पुण्यासह मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे.

कालपासून पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. मात्र, मुंबईतील चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली आहे. अशातच ठाणे, रायगड, पालघर आणि सिंधुदुर्गात या जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाचा मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आज दिवसभर पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

तर, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि सिंधुदुर्गात पुढील तीन तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन तासासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अचानक सुरू झालेल्या पावसामुळे पुण्यातील नागरिकांची देखील मोठी तारांबळ उडाली आहे. रस्त्यावर साचलेलं पाणी आणि सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाल्यामुळे नोकरदारांची मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT