Nashik MLC Election : नाशिकचा शिंदे पॅटर्न; तिन्ही मंत्र्यांनी निवडणुकीची स्क्रिप्ट आधीच लिहिली होती का?

Narendra Darade Defeat : नाशिक विधानपरिषद निवडणुकीचे राजकीय कवित्व आता अधिक जोमाने सुरू झाले आहे. निवडणुकीतील अनेक धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत. यामध्ये शिवसेना शिवसेनेचे आमदार आणि मंत्री उमेदवाराबरोबर राहून विरोधात काम करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Nashik MLC Election | Narendra Darade Defeat
Nashik MLC Election | Narendra Darade Defeat Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 24 Jun : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनचे नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला. हा दराडे कुटुंबीयांना मोठा राजकीय धक्का मानला जातो. त्याच्या तीव्र प्रतिक्रिया नेत्यांमध्ये उमटल्या आहेत.

नाशिक विधानपरिषद निवडणुकीचे राजकीय कवित्व आता अधिक जोमाने सुरू झाले आहे. निवडणुकीतील अनेक धक्कादायक प्रकार उघड झाले आहेत. यामध्ये शिवसेना शिवसेनेचे आमदार आणि मंत्री उमेदवाराबरोबर राहून विरोधात काम करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नरेंद्र दराडे यांना 258 मते मिळाली. शिवसेनेची 170 आणि भारतीय जनता पक्षाचे 200 अशी 370 हक्काची मते होती. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे १०७ मतदार होते. ४७७ हक्काची मते असताना पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला अवघी २५७ मध्ये मिळाले.

Nashik MLC Election | Narendra Darade Defeat
Fund War : ओम राजेनिंबाळकरांच्या बंडखोरीनंतर राणा पाटलांसोबत पहिल्या वादाची ठिणगी : धाराशिवमध्ये श्रेयवादाचे 'सोशल वॉर'

महायुतीची 200 मते फुटली. निवडणुकीआधी भाजपचे गणेश गीते यांच्या उमेदवारीवर सूचक म्हणून स्वाक्षरी केलेल्या भाजपच्या नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. आता निवडणुकीत थेट क्रॉस वोटिंग झाली आहे. त्यावर भाजप काय भूमिका घेणार? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

शिवसेनेचे आमदार सुहास कांदे आणि जिल्ह्यातील मंत्री दादा भुसे या दोघांची निवडणुकीतील भूमिका काय? अशी विचारणा होऊ लागली आहे. हे दोघेही स्थानिक नेते आहेत. मात्र त्यांनी निवडणूक निकालावर प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

Nashik MLC Election | Narendra Darade Defeat
Crime News : तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईने भेसळ माफिया हादरले : टपऱ्या बंद झाल्या; गुटखा मिळत नसल्याने थयथयाट

या संदर्भात पराभूत उमेदवार नरेंद्र दराडे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. त्यांच्या कन्या अत्यंत व्यथीत झाल्याने त्यांनी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले. त्यावर महायुतीच्या नेत्यांनी दराडे पराभवामुळे मानसिक दृष्ट्या खचले असे विधान करत सावरण्याचा प्रयत्न केला.

नाशिक विधानपरिषद निवडणुकीतून पुढे आलेला शिंदे पॅटर्न चर्चेचा विषय आहे. पक्षाच्या नेत्याला उमेदवारी द्यायची. त्याला खर्च करायला लावायचा. तोच खर्च विरोधी उमेदवाराबरोबर बसून आपल्याच उमेदवाराविरोधात करायचा. त्याला उमेदवारी दिली त्याच्या पराभवासाठी काम करायचे? यातील कोणती राजकीय विश्वासार्हता आणि प्रतिमा एकनाथ शिंदेंचा पक्ष राजकारणात आणू इच्छितो? यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com