Heavy rainfall has triggered landslides and road closures across Maharashtra Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra rain : मुसळधार पावसामुळे राज्यभरातील कोणकोणते रस्ते बंद? घरातून बाहेर निघण्यापूर्वी जाणून घ्या

Road closures Maharashtra : एकीकडे अनेक शहरांमध्ये पावसामुळे वाहतूक कोंडी झाली आहे, तर दुसरीकडे दरडी कोसळल्यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यभरातील कोणकोणते रस्ते पावसामुळे प्रभावित झाले आहेत आणि कोणते रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत ते जाणून घेऊया.

Jagdish Patil

Road closures Maharashtra : राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाण्यासह पुणे जिल्ह्यात शाळांना प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे. तर नागरिकांना देखील कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

एकीकडे पावसामुळे वाहतूक कोंडी झाली आहे, तर दुसरीकडे दरडी कोसळल्यामुळे अनेक ठिकाणचे रस्ते वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यभरातील कोणकोणते रस्ते पावसामुळे प्रभावित झाले आहेत आणि कोणते रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत ते जाणून घेऊया.

मिसिंग लिंक

सर्वात महत्त्वाचा आणि बहुचर्चिच असलेला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक देखील वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. मिसिंग लिंकवरील बोगदा क्रमांक २ च्या बाहेर दरड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक इतर मार्गांवर वळवण्यात आली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे

त्यामुळे सध्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई - पुणे जुना हायवेवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर तिकडे कर्जत आणि लोणावळा दरम्यानच्या दक्षिण-पूर्व घाट परिसरात, ठाकूरवाडी ते मंकी हिल दरम्यान रेल्वेच्या मुख्य मार्गावर दरड कोसळल्यामुळे मध्य रेल्वेने या मार्गावरील अनेक लोकल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याजवळ खवटी येथे मोठी दरड महामार्गावर कोसळली आहे. या घटनेमुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरड हटविण्याचे काम सुरू असले, तरी हा महामार्ग वाहतुकीसाठी अद्याप खुला केलेला नाही.

तसंच मुंबई-गोवा हायवे चिपळूण खवटीजवळ बंद ठेवण्यात आला आहे. रायगडमध्ये पेण-खोपोली मार्ग बंद आहे. तर रायगडमध्ये मुंबई-गोवा महामार्ग सुकेळी खिंडीत बंद करण्यात आला आहे. रायगड-माणगाव-पाली मार्ग देखील बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. रायगड-माणगाव-पुणे ताम्हणी घाट मार्ग देखील पावसामुळे बंद ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, सातारा जिल्ह्यात देखील पावसाने हाहाकार घातला आहे. महाबळेश्वर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोळशे नदीला मोठा पूर आला आहे. या पुरामुळे येरणे गावासह पाच गावांचा संपर्क तुटला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT