Missing Link Slab Collapse : मोठी बातमी! मिसिंग लिंकवर दरड कोसळली; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वाहतूकीसाठी बंद!

Mumbai Pune Expressway : मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नव्याने उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे–मुंबई किंवा मुंबई–पुणे असा प्रवास करू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात आलं आहे.
Mumbai Pune Expressway | Missing Link Slab Collapse | Traffic Halt
Mumbai Pune Expressway | Missing Link Slab Collapse | Traffic HaltSarkarnama
Published on
Updated on

Missing Link Slab Collapse : मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नव्याने उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर दरड कोसळली आहे. मिसिंग लिंकच्या एन्ट्री पॉईंटवर दरड कोसळल्याने इथली वाहतूक दुसरीकडे वळवण्यात आली आहे.

त्यामुळे सध्या मिसिंग लिंकवरील वाहतूक ठप्प झाली आहे. या घटनेमुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी लेनवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सुदैवाने, मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळल्याच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

तर या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास टाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. मुंबईकडे जाताना उर्से टोल नाक्यावर सर्व वाहतूक रोखण्यात आली आहे.

Mumbai Pune Expressway | Missing Link Slab Collapse | Traffic Halt
Maharashtra School Holiday: पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, डोंबिवली, वसई, विरारमध्ये सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे–मुंबई किंवा मुंबई–पुणे असा प्रवास करू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात आलं आहे.

MSRDC ने एक्सवर पोस्ट करत नागरिकांना आवाहन केलं आहे. त्यांनी लिहिलं की, "दरड कोसळणे व सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतूक गंभीरपणे प्रभावित झाली आहे.

Mumbai Pune Expressway | Missing Link Slab Collapse | Traffic Halt
Mankhurd Building Collapse : मुंबईत मुसळधार पावसामुळे चाळ कोसळली! घर सोडणार तोच होत्याचं नव्हतं झालं; 8 जणांचा जागीच मृत्यू

पुणे–मुंबई तसेच मुंबई–पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे–मुंबई किंवा मुंबई–पुणे असा प्रवास करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. अत्यावश्यक प्रवास असल्यास कृपया प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना व अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा. नागरिकांनी सहकार्य करावे, ही विनंती."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com