IAS Transfer Order Sarkarnama
महाराष्ट्र

IAS Transfer : महिन्याच्या पहिल्याच दिवशी तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या! नांदेड, लातूर आणि मुंबईत मोठे प्रशासकीय फेरबदल

Maharashtra IAS Officers Transfer : राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल झाले करण्यात आले आहेत.

Aslam Shanedivan

Maharashtra IAS officer transfers 2026 : पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला धक्का देत जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी तीन बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल करत या तिन्ही आयएएस (IAS) अधिकाऱ्यांना आपल्या जुन्या पदांचा कार्यभार सोपवून, नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे निर्देश दिले आहेत. या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे नांदेड, लातूर आणि मुंबईत मोठे प्रशासकीय फेरबदल झाले आहेत.

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी २२ जूनच्या रात्री 3 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले होते. ज्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महापारेषण यांसारख्या महत्त्वाच्या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता.

आयएएस संजीव कुमार यांची अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. तर महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनीच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदी आयएएस विक्रम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यानंतर आता सामान्य प्रशासन विभागाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेल्या आदेशात राज्यातील 3 वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या नवीन नियुक्तीनुसार नांदेड, लातूर आणि मुंबई येथील महत्त्वपूर्ण पदांवर सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

IAS महेश पाटील : महेश पाटील यांची नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी बदली करण्यात आली आहे. महेश पाटील हे २०१६ च्या तुकडीचे राज्य नागरी सेवेतून पदोन्नती मिळालेले आयएएस अधिकारी आहेत.

IAS राहुल कुलकर्णी : राहुल कुलकर्णी यांच्यावर लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदीची जबाबदारी देण्यात आली आहे.

तर IAS अशोक करंजकर यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन, मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालक पदी करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT