

IAS Transfer News : राज्यात महायुतीचे सरकार आले असून राज्याची धूरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात गेली आहे. ते मुख्यमंत्री झाल्यापासून प्रशासनात मोठ्या प्रमाणावर फेरबदल होताना दिसत आहेत. आजही (ता.९) फडणवीस यांनी कॅबिनेट बैठक सुरू असतानाच प्रशासनात फेरबदल करणारा निर्णय घेतला. राज्यातील चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरूच असल्याचे समोर आले आहे.
गेल्या महिन्यातच सामान्य प्रशासन विभागाने चार वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात या बदल्यांची जोरदार चर्चा झाली होती. ही चर्चा थांबते न थांबते तोच आज चार बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय घेण्यात आला आहे. यात आयएएस अधिकारी आदित्य जिवाणे, अनिता मेश्राम यासारख्या बड्या अधिकाऱ्यांच्या समावेश असून मंगळवारी (ता.९) सायंकाळी सहा वाजता हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
दोन आठवड्यापूर्वी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांचीदेखील अशीच बदली करण्यात आली होती. मुंढे यांच्या बदलीमुळे सरकारच्या निर्णयाची जोरदार चर्चा झाली होती. यानंतर आता या आठवड्यात देखील राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश निघाल्याने बदल्यांची परंपरा कायम राहिल्याची आता चर्चा होताना दिसत आहे.
कोणाची बदली कुठे?
IAS अनिता मेश्राम यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला येथून मनरेगा, नागपूर येथे बदली करण्यात आली आहे.
तर छत्रपती संभाजीनगर येथील महावितरणमध्ये सहव्यवस्थापकीय संचालक असणारे IAS आदित्य जिवाणे यांची बदली जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून करण्यात आली आहेत.
तसेच IAS डॉ. माधवी खोडे-चावरे यांची अतिरिक्त विभागीय आयुक्त, नागपूर या पदावरून अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिव म्हणून मंत्रालयात बदली करण्यात आली आहे.
तर IAS सुनील महिंद्राकर यांची अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात राज्य सरकारने तब्बल ११ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.