Sikandar Shaikh Accident sarkarnama
महाराष्ट्र

Sikandar Shaikh Accident : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखचा मोठा अपघात : बक्षीस मिळालेल्या 'थार' गाडीचा चक्काचूर

Sikandar Shaikh Injured : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याच्या गाडीच्या अपघातचे फोटो समोर आले आहेत. या अपघातात सिकंदर जखमी झाल्याची माहिती आहे.

Rahul Gadkar

Sikandar Shaikh News : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात सिकंदर शेख जखमी झाला असून बक्षीस मिळालेल्या धार गाडीचा अपघात स्थळी चक्काचूर झाला आहे. सांगली जिल्ह्यातील विठ्ठलवाडी येथे नागपूर रत्नागिरी महामार्गावर अपघात झाल्याची माहिती आहे.

मिळालेली माहितीनुसार, सिकंदर शेख हा कामानिमित्त सोलापूरला जात होता. रत्नागिरी नागपूर महामार्गावरील विठ्ठलवाडी येथे आल्यानंतर बाजूला असणाऱ्या साईड दुभाजकला गाडी धडकण्याची माहिती आहे.

झालेल्या अपघातात गाडीचा पुढील भाग हा चक्काचूर झाला आहे. दरम्यान सिकंदर शेख याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. सदरच्या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. शेख यांच्यासोबत आणखी कोण होते? याची माहिती मात्र समजू शकली नाही.

महाराष्ट्राची मान उंचावणारा पैलवान

पैलवान सिकंदर शेख हा सध्याच्या भारतातील कुस्ती क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय नाव आहे. तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ गावचा असून अत्यंत गरीब परिस्थितीतून पुढे आला आहे. सिकंदरने कोल्हापूरच्या ऐतिहासिक 'गंगावेश तालमीत' वस्ताद विश्वास हारुगले यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवले.

अत्यंत आक्रमक कुस्ती शैलीसाठी तो ओळखला जातो. त्याने प्रतिष्ठेचा 'महाराष्ट्र केसरी' किताब पटकावला असून, पंजाबमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेत 'रुस्तम-ए-हिंद' हा किताबही महाराष्ट्राला मिळवून दिला आहे. मातीच्या कुस्तीत त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT