Ladki Bahin Yojana Sarkrnama
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचं भवितव्य काय? अनेक शंका-कुशंका; फडणवीसांच्या बजेटमधील विधानामुळे चर्चा रंगली

Maharashtra budget session, CM Fadnavis clarified the future of the ‘Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana' addressing growing speculation about whether the scheme will continue or be discontinued : माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू राहणार की, बंद पडणार यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प मांडताना मोठं भाष्य केलं आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra Budget 2026 : आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न हे 3 लाख 17 हजार 801 रुपये असल्याची सुधारीत आकडेवारी जाहीर करत, महाराष्ट्र दरडोई उत्नन्नात देशात पाचव्या क्रमांकावर कायम आहे.

असे असतानाच, विधानसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने सुरू राहाणार की, बंद पडणार, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प मांडताना मोठं भाष्य केलं.

गेल्या महिन्यांत लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्याच्या सूचना होत्या. यात अनेक लाभार्थ्यांच्या ई-केवायसी झाली नाही. त्यामुळे लाखो लाभार्थ्यांना लाकडी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले.

विदर्भ, मराठवाडा अन् कोकण (Kokan) भागातील लाभार्थींना याचा सर्वाधिक फटका बसला. विदर्भ अन् मराठवाडा इथं लाभार्थी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढत, लाभ मिळत नसल्याकडे लक्ष वेधलं. सरकार अन् प्रशासनाविरोधात आक्रोश व्यक्त केला.

शिंदेसेनेच्या नेत्याचं मोठं विधान

अशा मोर्चानंतर देखील ई-केवायसीच्या नावाखाली या लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही. काहींनी लाभ सोडून दिला. यातच एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेत रामदास कदम यांनी, एक लाडकी बहीण योजना बंद केली तर, त्याऐवजी आणखी दहा योजना सुरू करता येतील, यामुळे लाडकी बहीण योजना बंद पडणार अशा चर्चांना बळ मिळाले.

हप्ते वितरणाचा अडथळे

लाडकी बहीण योजना बंद पडणार असल्याची चर्चा सुरू असतानाच, महाराष्ट्रातील लाभार्थींना गेल्या अनेक महिन्यांपासून वेळेवर हप्ते गेले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही योजना बंद पडणार असल्याचीच चर्चा सर्वाधिक होती. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यादांच महाराष्ट्राचा यावेळचा अर्थसंकल्प मांडत असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली.

वाढीव हप्त्याचं काय?

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहणार. तसेच या योजनेकरिता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आली आहे’, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प मांडताना केली. ही घोषणा करताना, योजनेतील महिला लाभार्थ्यांना कोणताही वाढीव लाभाची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली नाही.

मुख्यमंत्र्यांची घोषणा

या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असून, या योजनेचे हप्ते अनेकदा लांबणीवर पडले आहेत. यामुळे ही योजना सुरू राहणार की बंद होणार याबाबत वारंवार अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या अर्थसंकल्पामधून केलेल्या घोषणेमुळे ही योजना यापुढेही सुरू राहणार असल्याचे निश्चित झाले आहे.

लाभार्थी संख्येत मोठी घट

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सध्या सुमारे 1.57 कोटी पात्र लाभार्थी महिला आहेत, ज्यांना डिसेंबर 2024चा हप्ता मिळाला आहे. सुरुवातीला लाभार्थींची संख्या 2.43 कोटींच्या आसपास होती. परंतु ई-केवायसी आणि कागदपत्रांच्या छाननीनंतर लाभार्थी संख्येत मोठी घट झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT