Shiv Sena News : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची (Maharashtra Legislative Council Election) तयारी सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून दोघांची उमेदवारी जाहीर केली. मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब (Anil Parab News) यांना तर मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी प्रा. ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण आता परबांच्या उमेदवारीला स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने विरोध केला आहे.
स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून राज्यातील विविध भरती परीक्षांमधील घोटाळे समोर आणले आहेत. स्पर्धा परीक्षा (Competitive Examination) विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी समितीकडून सातत्याने आवाज उठवण्यात येतो. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) समितीने शाहू महाराज, प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी, विशाल पाटील यांच्यासह आणखी काही उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला होता. (Latest Political News)
आता समितीने विधानपरिषदेच्या निवडणुकीत परबांना विरोध केला आहे. समितीने ‘एक्स’वर याबाबत पोस्ट करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अनिल परब यांनी बेरोजगारांसाठी, पदवीधरांसाठी असं कोणतं काम केलंय ज्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे?, असा आमचा प्रश्न असल्याचे समितीने म्हटले आहे. (Latest Marathi News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विधानसभेच्या निवडणुकीबाबत (Assembly Election) आम्ही समजू शकतो, पण निदान पदवीधर निवडणुकीत तरी पदवीधरांसाठी, बेरोजगारांसाठी धडाडीने काम करणाऱ्या नेत्याला उमेदवारी मिळाली पाहिजे. निवडून आल्यानंतर पदवीधरांना सहज उपलब्ध होणारा, आमच्या प्रश्नांची जान असणारा आणि बेरोजगारांचे प्रश्न विधानपरिषदेत मांडू शकणारा उमेदवार आम्हाला मुंबई पदवीधर साठी हवा आहे, अशी भूमिका समितीने घेतली आहे.
...तर भाजप उमेदवाराला मतदान
भाजपच्या (BJP) सत्ताकाळात बेरोजगारांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पण शिवसेनेने पदवीधरसाठी योग्य उमेदवार दिला नाहीच. तुल्यबळाने भाजपचा स्थानिक उमेदवार अधिक योग्य असल्यास, नाईलाजाने बेरोजगारांना भाजपच्या उमेदवाराला मतदान करावे लागेल, असेही समितीने म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.