Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency : शिंदे सेनेचे आमदार बोरनारे लोकसभेत किती मताधिक्य मिळवून देणार?

Shivsena Political : लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचा विचार केला तर महायुतीने येथे मंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी दिली होती. जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघ वगळता पाचही मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे आमदार आहेत.
Ramesh bornare
Ramesh bornare Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : लोकसभा निवडणूक 2024 आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर आता सगळ्यांचे डोळे लागले आहे ते चार जूनच्या निकालाकडे. लोकसभा निवडणुकीचे निकाल सत्ताधारी महायुतीच्या बाजूने असेल तर राज्यात मुदतपुर्व विधानसभा निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, अशी चर्चा होताना दिसते आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील विद्यमान सत्ताधारी आमदारांच्या कामगिरीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.

लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचा विचार केला तर महायुतीने येथे मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांना उमेदवारी दिली होती. जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदारसंघ वगळता पाचही मतदारसंघात शिवसेना-भाजप (Bjp) युतीचे आमदार आहेत. त्यामुळे भुमरे विजयी होतात का? झाले तर त्यांना कोणत्या मतदाराच्या मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

2019 च्या विधानसभा निकालावर नजर टाकली तर जिल्ह्यातील सहा मतदारसंघापैकी वैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारे (Ramesh Bornare) हे सर्वाधिक मताधिक्य मिळवून निवडून आले होते. (Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Constituency News)

Ramesh bornare
Eknath Shinde News : पुण्यातील अपघातप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंच मोठं विधान; म्हणाले, दोषींवर कठोर...

अर्थात तेव्हा राज्यात शिवसेना-भाजप युती होती. बोरनारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अभय पाटील चिकटगावकर यांचा तब्बल 59 हजार 163 मतांनी पराभव केला होता. दिवंगत माजी आमदार आर. एम. वाणी यांना आपले राजकीय गुरू मानणाऱ्या बोरनारे यांना विधानसभेची उमेदवारी त्यांच्याच शिफारशीने मिळाली होती. उद्धव ठाकरे यांनी बोरनारे यांच्या प्रचारासाठी तर अभय पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी वैजापूरात सभा घेतली होती. पण युतीच्या भक्कम पाठिंब्यामुळे बोरनारे यांनी बाजी मारली.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडात पहिल्यांदाच निवडून आलेल्या बोरनारे यांनी उडी घेतली आणि त्यांच्या कपाळी गद्दारीचा शिक्का बसला. गेल्या दीड-दोन वर्षात त्यांना शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधाचा मोठा सामना करावा लागला. अगदी हमरीतुमरी आणि हातघाईचे प्रसंगही आले. पण एकनाथ शिंदे यांच्याकडून मतदारसंघाच्या विकासकामासाठी भरघोस निधी मिळवत बोरनारे यांनी विरोधकांवर मात करण्याचा प्रयत्न केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बोरनारे यांची प्रतिष्ठा वैजापूरमध्ये पणाला लागली आहे. ठाकरे गटाकडून विधानसभा लढवण्यास इच्छूक असलेले माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांनी महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांच्यासाठी मतदारसंघात जोर लावला होता.

शिवसेना-राष्ट्रवादीत फूट पडल्याने महायुती-महाविकास आघाडीची परिस्थिती सारखीच झाली आहे. अशावेळी वैजापूरमध्ये महायुतीचे लोकसभेचे उमेदवार संदीपान भुमरे यांना किती मताधिक्य मिळते? यावर रमेश बोरनारे यांच्या 2024 मधील उमेदवारीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

(Edited By : Sachin Wagmare)

Ramesh bornare
Chhatrapati Sambhaji News: पंचवीस वर्षांनंतर पुन्हा एकदा संभाजीनगरात मशाल..

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com