Vidhansabha Sarkarnama
महाराष्ट्र

विधानपरिषदेची रणधुमाळी : कोल्हापूरसह ६ जागांसाठी निवडणूक जाहीर

१६ डिसेंबरपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सरकारनामा ब्युरो

दिल्ली : राज्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील रिक्त होत असलेल्या ८ पैकी ६ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. अहमदनगर आणि सोलापूर वगळता मुंबई, कोल्हापूर, धुळे-नंदुरबार, अकोला-बुलढाणा-वाशिम आणि नागपूर या ५ मतदारसंघातील ६ जागांसाठी १० डिसेंबरला मतदान होणार आहे. तर मतमोजणी १४ डिसेंबरला होणार आहे. या ८ आमदारांची मुदत येत्या १ जानेवारी २०२२ रोजी संपत आहे.

अहमदनगर आणि सोलापूर या मतदारसंघातील मतदार अर्थात महानगरपालिका, नगरपालिकांचे नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती यांची संख्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने या ठिकाणी निवडणूक जाहीर करण्यात आलेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका पार पडल्यानंतर त्या घोषित होण्याची शक्यता आहे.

येत्या १ जानेवारी २०२२ निवृत्त होत असलेले आमदार : निवृत्त होत असलेल्या आमदारांच्या यादीत रामदास कदम (शिवसेना) मुंबई, भाई जगताप (काँग्रेस) मुंबई, सतेज पाटील (काँग्रेस) कोल्हापूर , प्रशांत परिचारक (अपक्ष) सोलापूर, अमरिश पटेल (भाजप) धुळे- नंदुरबार, गोपीकिशन बजोरिया (शिवसेना) अकोला-बुलढाणा , गिरिशचंद्र व्यास (भाजप) नागपूर, अरूण जगताप (राष्ट्रवादी) अहमदनगर यांचा समावेश आहे.

निवडणूक कार्यक्रम

विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी अधिसूचना १६ नोव्हेंबरला काढण्यात येणार आहे. तर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २३ नोव्हेंबर २०२१ असणार आहे. २६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. १० डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर या निवडणुकीची मतमोजणी १४ डिसेंबरला होणार आहे. १६ डिसेंबरपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT