Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Legislative Council Election : देवेंद्र फडणवीसांचे धक्कातंत्र, मोहिते पाटील, केचेंचा पत्ता कट? विधान परिषदसाठी 'या' नेत्यांची नावे चर्चेत!

Devendra Fadnavis Ranjitsinh Mohite Patil Dadarao Keche : विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची रणनीती आखण्यात आली आहे.

Roshan More

Devendra Fadnavis News : विधान परिषदेसाठी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरु करण्यात आली आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची रणनीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असून रणजितसिंह मोहिते पाटील यांना पुन्हा संधी मिळणार नसल्याची भाजपच्या अंतर्गत वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे उमेदवारीतून मोहित पाटील यांचा पत्ता कट झाल्याचे बोलले जात आहे.

विधान परिषद निवडणुकीत भाजपचे पाच उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. त्यामुळे विधान परिषदेतून नुकतेच निवृत्त झालेले भाजपचे सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील, दादाराव केचे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत पक्षातून दिले जात आहेत. तर, निवृत्त झालेल्या सदस्यांपैकी संदीप जोशी यांनी आपण निवडणूक लढणार नसल्याची घोषणा यापूर्वीच केली आहे.

नवीन चेहऱ्यांना संधी असे धोरण पक्षाकडून ठरवले जात असताना मात्र संभाजीनगरचे संजय केनेकर यांच्यावर मात्र पुन्हा विश्वास व्यक्त केला जाण्याची शक्यता आहे. त्यांना पक्षाकडून पुन्हा उमेदवारी मिळेल, असे चित्र आहे. दरम्यान, एका महिला नेत्याला देखील विधान परिषदेवर पक्षाकडून संधी मिळणार आहे.

'या' नेत्यांची नावे चर्चेत

भाजपअंतर्गत उमेदवारी मिळण्यासाठी नेत्यांकडून मोर्चे बांधणी सुरु करण्यात आली आहे. भाजपच्या रणनीतीकारांपुढे जातीय आणि प्रादेशिक समतोल राखत उमेदवारी निश्चित करण्याचे आवाहन असणार आहे. दरम्यान, माजी आमदार राम सातपुते, रणजीत सिंह निंबाळकर, केशव उपाध्ये, माधवी नाईक यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. भाजप यांना संधी देणार की राज्यसभेप्रमाणे धक्कातंत्र अवलंबणार यावर देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT