Legislative Council Election : उद्धव ठाकरेंची निवडणुकीच्या मैदानातून माघार? विधान परिषदेसाठी 'या' नेत्याला मिळणार उमेदवारी...

Uddhav Thackeray Ambadas Danve : विधान परिषदेसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. मात्र, या निवडणूक लढण्यास उद्धव ठाकरे उत्सुक नसल्याची माहिती आहे. त्यांच्या ऐवजी ठाकरेंच्या शिवसेनकडून दुसरा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray News : विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. 12 मे रोजी मतदान होणार आहे. 10 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत महाविकास आघाडीचा फक्त एक उमेदवार विजयी होऊ शकतो. उद्धव ठाकरे हे विधान परिषदेमधून निवृत्त झाले आहेत. तेच आघाडीचे उमेदवार असतील अशी शक्यता होती. मात्र, पुन्हा विधान परिषदेमध्ये जाण्यासाठी उद्धव ठाकरे उत्सुक नसल्याची माहिती आहे. ते निवडणूक न लढण्यावर ठाम असल्याचे वृत्त एका मराठी वृत्तपत्राने दिले आहे.

उद्धव ठाकरेंच्या ऐवजी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना विधान परिषदेसाठी संधी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. विधान परिषदेचे संख्याबळ पाहाता ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, ठाकरेंच्या भूमिकेनंतर काँग्रेस काय भूमिका घेते याकडे देखील अनेकांचे लक्ष लागले आहे.

विधान परिषदेमधून 9 जण निवृत्त झाले आहेत.त्यातील भाजपच्या वाट्याला सहा, सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस एक तर, शिंदेंच्या शिवसेनेचे एक असे आठ जण सहज विजयी होऊ शकतात. महाविकास आघाडीकडे 46 जणांचे संख्याबळ आहे. त्यामुळे त्यांचा देखील एक उमेदवार निवडणूक येऊ शकतो. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Uddhav Thackeray
Legislative Council Election: पडळकर तर विधानसभेवर गेले,भाजपचे निष्ठावंत आता म्हणतात, ‘मेरा नंबर अब आयेगा...?

पवारांचा ठाकरेंच्या शिवसेनेला पाठींबा

शरद पवार यांनी ही निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेकडून जे कोणते नाव येईल, त्याला आमचा पाठींबा असेल असे जाहीर केले होते. तर, काँग्रेसने मात्र उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर आम्ही पाठींबा देऊ अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे काय निर्णय घेणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

Uddhav Thackeray
Legislative Council Election : भाजपकडून माथाडी नेत्याला मिळणार विधान परिषदेवर संधी?; चंद्रशेखर बावनकुळेंनी दिला ‘हा’ शब्द!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com